राजकीय

आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेतात, अन् तिथून गुवाहाटीला जातात हे आश्चर्यकारक : अनिल गोटे

टीम लय भारी

मुंबई : मी दूरचित्रवाणीवर बघतोय. आमदार येतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात. अन् नंतर ते गुवाहाटीमध्ये पोचतात. हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ ही मंडळी हृदयापासून विचार करीत नाहीत. ते खिशातून विचारत करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनिल गोटे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे सरकार वाचावे यासाठी कुठल्याच नेत्याने प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तसे प्रयत्न झाल्याचे मी मानायला तयार नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.सत्तेचे बाजारीकरण झाले आहे. यापूर्वी कधीही लोकशाहीचे इतके बिभत्स रूप पाहायला मिळाले नव्हते. पैशांचा व काळ्या पैशांचा सर्रास वापर झाल्याचे दिसत आहे.

जे गेले ते काही राजकुमार नाहीत. त्यांच्याकडे इतका पैसा कुठून आला ?. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना हे सगळं दिसत नाही का ? असे सवालही अनिल गोटे यांनी केले आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘बंडोपंतां‘चा पंचतारांकीत हॉटेलांचा, चॅटर्ड विमानांचा खर्च करतयं कोण ?

उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !

राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

1 hour ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

3 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

4 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

5 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

5 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

5 hours ago