27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयउध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !

उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट,एकनाथ शिंदेंना शिव्यांचा भडीमार !

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला. त्यांच्या निष्ठावंतांनीच त्यांना धक्का दिला. त्यामुळे अल्पमतात आलेले सरकार कोसळल्याची स्थिती निर्माण झाली. याला कारण उध्दव ठाकरेंनी त्यांच्या मावळयांवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास टाकला. ‘अति विश्वास न कर्तव्यम‘ या म्हणीचा प्रत्यय त्यांना आला.

काल उध्दव ठाकरे वर्षां बंगल्या बाहेर पडले. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. अनेक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घाबरु नका. शिवसेना हे एक कुटुंब आहे. आपण एकाच कुटुंबातले सदस्य आहोत असा विश्वास दिला.
‘दोस्त दोस्त न रहा‘ याचा अनुभव आला. शत्रू देखील जे दुःख देणार नाही ते दुःख आपल्या माणसांनी दिले. हा अनुभव राज्यातील सर्व जनतेला आला. त्यामुळे जनतेला देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंविषयी सहानुभूती निर्माण झाली.

सामान्य कार्यकर्ता तसेच शिवसैनिक हे उध्दव ठाकरेंच्या बाजूने आहेत. तर सगळे आमदार आणि काही खासदार हे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या बाजूने आहेत. अनेकांनी एकनाथ शिंदेंना शिव्या शाप दिले आहेत. तसेच त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांविषयी त्यांच्या मतदार संघात नाराजी निर्माण झाली आहे. चोरा सारखं पळू गेलल्यांना आपल्या मतदार संघात पाय ठेवून देवू नका असा पवित्रा देखील अनेकांनी घेतला आहे.

फडणवीस एकनाथ चा अ‘नाथ‘ करतील.

ईडीच्या भितीमुळे घोटाळे उघडकीस येेत आहेत म्हणून भाजप रडीचा डाव खेळत आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे समर्थकांचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या गुलाबराव पाटलांना देखील अनेकांनी सोशल मीडियावर टार्गेट केले आहे.‘ हा आमच्या तालुक्याचा टपरीवाला, पत्त्यांच्या क्लबमध्ये पाणी वाटायचा, नंतर पान टपरी टाकली. बाळासाहेबांनी संधी दिली आणि यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आज त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली.

हे सुद्धा वाचा :राजकीय संकट असतानाही उध्दव ठाकरे सरकारने शेतकरी, तरुणांसाठी घेतले स्तुत्य निर्णय

मेरा पानी उतरता देख। ‘मेरे किनारे पर घर मत बसा देना ‘मैं समंदर हूँ ‘। लैटकर वापस आउॅंगा।

‘बंडोपंतां‘चा पंचतारांकीत हॉटेलांचा, चॅटर्ड विमानांचा खर्च करतयं कोण ?

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी