मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!

भारतीय जनता पक्षाने आजच्या मोर्च्यावरून महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे. (MVA Morcha Mapurush Avman) “मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!,” असे ट्विट भाजपा महाराष्ट्रने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केले आहे. आघाडीच्या मोर्चात प्रचंड गर्दी होती. सुमारे लाखभर कार्यकर्ते असावेत, असे अंदाज सांगितले जात आहे. मात्र, फ्लायओव्हरवरील नेमका अॅंगल पकडून मोर्चा सरतानाचा फोटो भाजपने व्हायरल केला आहे. आघाडीला खिजवण्याचा हा प्रयत्न आहे.

मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ!
हे तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत…
यापेक्षा जास्त तर एका लग्नातील वऱ्हाड असते!
असे भाजपा महाराष्ट्रचे ट्विट आहे. यावर समर्थक-विरोधक नेते व कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. “विराट लाट….. संतापाची आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची!” असे ट्विट करत राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी प्रचंड गर्दीचा त्याच फ्लायओव्हरवरील व्हिडीओ शेयर केला आहे. तोच रिट्विट करत अजय बारसकर हा कार्यकर्ता लिहितो, “वरात निघाली आहे तुमची वरात काढायला.” शिवसेनेने म्हटले आहे, “भगवं वादळ निघालंय, महाराष्ट्रद्रोह्यांना जाब विचारायला !” प्रा.शिल्पा बोडखे यांनी, “मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी महामोर्चाचे भगवे वादळ…” असे वर्णन केले आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र प्रेमी समुदायाने काढलेल्या विराट मोर्चाची काही निवडक क्षणचित्रं! पाहणाराचं vision विशाल असेल तर फोटोही तसेच दिसतील आणि vision ‘नॅनो’ असेल तर अतिविराट मोर्चाही ‘नॅनो’च दिसेल!
– रोहित पवार

बी.एम. संतोष (संत्या) हा कार्यकर्ता म्हणतो, “कमळीबाई जसं लोकांपुढे खोटं बोलतात, तसं सोशल मीडियावर पण खोटं पसरण्याचं काम अचूकपणे करतात.. लग्नाची वरात गेल्यानंतर फोटो काढून ती पब्लिसिटीसाठी सोशल मीडियावर टाकतात.. पाहा हा प्रचंड गर्दीचा कमळीबाईसाठी पुरावा.” शिवसैनिक हर्षद भाटकर म्हणतो, “अहो किती खोटे बोलाल.. आणखी शेवटचा फोटो काढायाचा होता ना, तर त्यात एकपण माणूस नाही दिसला नसता!” सुमीत जाधव म्हणतो, “@BJP4Maharashtra हे अकाउंट गौतम गाडे चालवतो आहे, आम्हला माहितेय. गाडे, हा प्रचंड गर्दीचा व्हिडिओ बघून घे आणि बरनॉल चोळून घे!” सोमनाथ गर्जे म्हणतो, “अरे महाराष्ट्रद्रोह्यांनो…. ‘उघडा डोळे, बघा नीट”

महाविकास आघाडीचा महामोर्चा हा फक्त दिखावा आहे, अडीच वर्षांच्या गलथान कारभारावरून लक्ष हटवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न यशस्वी होणार नाही
– भाजपा महाराष्ट्र @BJP4Maharashtra

हे सुद्धा वाचा :

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे; शरद पवार कडाडले

यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद

आता शिवरायांच्या पंक्तीत मोदींना बसवू पाहत राज्यपाल पॅकअपच्या मूडमध्ये; घटनात्मक पदाचा प्रोटोकॉल धाब्यावर, राष्ट्रपतींऐवजी अमितभाईंकडे मागितले मार्गदर्शन!

प्रज्ञा पवार लिहिते, “अरे भाजप्यानो, डोळे उघडून पहा. गर्दी पाहून घाम फुटेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत ते “महाराष्ट्र द्रोही”. जनता हे लक्षात ठेवेल व योग्य वेळी महाराष्ट्रद्रोही भाजपला धडा शिकवेल.” अनुज गायकवाड म्हणतोय, “म्हणूनच भाजपाच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त म्हणतात…कुठेही काहीही बघायचं आणि बोंबलायचं..” क्षितिज लांडगेने ठाण्यातील मोर्चाचा फोटो शेयर केलाय. त्यासोबत लिहिलेय, “भाजपचा आणि मिंधे गटाचा ठाण्यातील अति विराट मोर्चा! खोके सरकार”

MVA Morcha Mapurush Avman, BJP Tweet Photo, @BJP4Maharashtra मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ

विक्रांत पाटील

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

11 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

12 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

12 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

13 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

13 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

15 hours ago