29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयअसा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे... शरद पवार कडाडले

असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे… शरद पवार कडाडले

३५० वर्षांपासून मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या नावाची राज्यपाल बदनामी करत आहेत. म. फुले, शाहू, डॉ. आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील ही आमची श्रद्धास्थाने आहेत. त्यांच्यावर हे लोक बोलत आहेत. इतिहासात असा राज्यपाल झाला नाही, माझ्या ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक राज्यपालांनी महाराष्ट्राच्या लावलौकीकाला साजेसे काम केले. पण आज एक व्यक्ती आली ती महाराष्ट्राच्या विचारधारोविरेधात बोलत आहेत. त्यांना शरम वाटली पाहिजे. आज शिवरायांची बदनामी मंत्री, अन्य घटक करतात हे महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यामुळेच आज लाखोंच्या सख्येने आलात. हा इशारा आहे, त्याची दखल घेतली नाही तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

सीमा प्रश्न, महापुरुषांची बदनामी, बेरोजगारी अशा मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चाला शरद पवार यांनी संबोधीत केले. या वेळी बोलताना ते म्हणले. या राज्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर, म. फुलेंचे नाव घेऊन भीक त्यांनी भीक मागितली असा उल्लेख केला.
आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाचे दालन उभे केले. फुलेंने पुण्यात केले. कर्मवीर पाटलांनी सबंध आयुष्य ज्ञानदानासाठी घालवले. सन्मान जपला. आज या कर्मविरांचा उल्लेख भीक मागतात असा केला जातो, त्यांनी लाचारी घेतली नाही. आज रयतमध्ये चार लाख विद्यार्थी शिकतात. अशा कर्मवीर, फुले आंबेडकरांबद्दल गलीच्छ शब्द वापरत असतील तर आज महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपले विचार वेगळे असतील तरी एकत्र आलो.

हे सुद्धा वाचा
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले शरद पवार, उद्धव ठाकरे?

आज राज्याच्या काणाकोपऱ्यातून ही शक्ती एकत्र आली कारण महाराष्ट्रचाच्या सन्मानासाठी. महाराष्ट्राच्या सन्मानावर हल्ले होत आहेत. ज्यांच्या हातात सुत्रे आहेत ते सत्तेतील लोक आज वेगळी भाषा वापरत आहेत. शिवरायांनी देशाला दिशाला देण्याचे काम केले. अनेक राजे होऊन गेले. महात्मा फुलेंचे नाव देशभरात आदराने घेतात अशा व्यक्तीचा टींगलटवाळी राज्यपाल करत असतील तर त्यांना राज्यपाल म्हणून राहण्याचा आधिकार नाही, केंद्राला विनंती आहे हकालप्टी करा अशी मागणी देखील पवार यांनी यावेळी केली.

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी