26 C
Mumbai
Tuesday, January 30, 2024
Homeमहाराष्ट्र...यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद

…यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही; उद्धव ठाकरेंचा मुंबईत शंखनाद

महापुरुषांची बदनामी, सीमाप्रश्न तसेच बेरोजगारी अशा मुद्द्यावर आज मुंबईत महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray attack BJP Shinde group ) यांनी संबोधीत केले.

राज्यात येणारे उद्योगधंदे पळवाचे काम केले जात आहे. तसेच सीमाप्रश्नावर बोलताना ते म्हणाले गावे कुरडायची कामे देखील ते करत आहेत. त्यामुळे यांचा शेवट केल्याशिवाय गप्प बसायचे नाही. हा मोर्चा याची सुरूवात आहे. आजचा मोर्चा हा महाराष्ट्राची शक्ती आहे, त्यामुळे ही रस्त्यावर उतरलेली गर्दी आगडोंब केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. महापुरुषांची बदनामी, सीमाप्रश्न तसेच बेरोजगारी अशा मुद्द्यावर आज मुंबईत महाविकास आघाडीने महामोर्चा काढला होता. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray attack BJP Shinde group ) यांनी संबोधीत केले.

यावेळी त्यांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले महाराष्ट्रातील आदर्श संपवून टाकायचे काम केले जात आहे. त्यामुळे आज आपल्या आवाजाने दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून गेला पाहिजे. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसत आहेत फक्त महाराष्ट्रद्रोही या मोर्चात नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातो म्हणणारे तोतये या मोर्चात नाहीत. महाराष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही म्हणणारे आज गप्प आहेत.

हे सुद्धा वाचा
असा राज्यपाल इतिहासात पाहिला नाही, शरम वाटली पाहिजे… शरद पवार कडाडले

यशवंतराव होळकरांचे कर्तृत्व शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी!Exclusive: अशोक चव्हाणांचा बाजार रवींद्र चव्हाणांनी उठविला !

जितेंद्र आव्हाड स्टाईल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल, भाजप आमदाराची फजिती !

मुंबई आमची आई.. मुंबाआई आहे

मुंबईचा लचका तोडत आहेत, मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय करणार होतो. ती जगा बिल्डरच्या घशात घातली जात आहे, रंगभूमी दालन उभारणार होतो त्याचे आता काय झाले माहित नाही, महाराष्ट्र भवन उभारणीच्या कामाचे काय झाले माहित नाही मुंबई आमची आई.. मुंबाआई आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक वर्षांनी देशाने असा मोठा मोर्चा पाहिला असेल, अनेक जण बोलले तुम्ही एवढे चालणार का मी म्हणालो माझ्यासोबत हे सर्व महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार.
राज्यपाल कोश्यारी यांचा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला ते म्हणाले, मी त्यांना राज्यपालच मानत नाही. राज्यपाल पदावर कोणीही बसावे हे सहन करणार नाही. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा देखील त्यांनी समाचार घेतला, ते म्हणले मंत्र्यांनी भीक हा शब्द वापरला, शेण, दगड धोंडे खाऊन शिक्षण दिले महिलांना. भीक मागितली हा शब्द म्हणजे बौध्दीक भिखारी आहेत.

तसेच अब्दुल सत्तार यांच्यावर देखील त्यांनी टीका केली ते म्हणाले एक मंत्री सुप्रिया बद्द्ल अपशब्द, मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मंत्री मुंबईचे पालकमंत्र्यांनी शिवरायांची बरोबरी खोकेवाल्याशी केली. शिवरायांनी आग्र्याहून सुटल्यानंतर स्वराज्य स्थापन केले खोकेवाल्यांनी पक्षाशी गद्दारी करुन स्वत:च्या आईच्या पाठीत सुरा खुपसला असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी