राजकीय

निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी या चोरांना चोर म्हटल्यास गुन्हा ठरतो का; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

मोदी-अदानीचा संबंध काय? अदानीच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील व परदेशातील कंत्राटे देण्याचे कारण काय? हे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले म्हणून राजकीय सुडबुद्धीने भाजपा सरकारने राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली. निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटला, या चोरांना चोर म्हटले तर देशता गुन्हा ठरतो? असा सवाल करतानांच नरेंद्र मोदींचा भांडाफोड होऊ नये म्हणून खोट्या केसमधून राहुल गांधी शिक्षा सुनावण्यात आली, खासदारकी रद्द केली आणि सरकारी घर सोडण्यास सांगून बेघर केले, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी भाजपवर केला.

मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळे खोटी तक्रार करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मौदानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्यांक विभागाने धरणे आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी, नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत असून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाकावे लागेल, असे पटोले यावेळी म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, गांधी कुटुंबाने देशाला सर्वस्व अर्पण केले आहे, देशासाठी बलिदान दिले, त्यांची कोट्यवधी रुपयाची संपत्ती व स्वतःचे घर दान केले आणि ते सरकारी घरात राहत असतानाही त्यांना बेघर करण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. अत्याचारी, जुलमी ब्रिटीश सत्तेला काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशातून हाकलून लावले, सध्या देशात ब्रिटीश सरकार सारखीच जुलमी सत्ता आहे, त्यांच्या हातातून देशाला वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षावर आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रकात पाटलांचा डाव पुण्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी उधळला
एका वर्षाच्या शिक्षेच्या सुनावणीत 2 महिने आधीच नवज्योत सिद्धू तुरुंगातून बाहेर?
अल्प बचत योजना: पॅन आधार अनिवार्य; अन्यथा चालू खाते बंद होईल!

मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीचा भांडाफोड करा, सर्वसामान्य जनतेचे पैसे कसे लुटले, राहुल गांधी जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय आकसातून कारवाई केली, हे जनतेपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेस पक्षात विविध प्रकारचे ३९ सेल आहेत, या सेलच्या माध्यमातून प्रत्येक समाज घटकाला काँग्रेस विचारधारेशी जोडून हुकुमशाही आणि गरीब, दलित आदिवासी व अल्पसंख्यांकविरोधी विरोधी भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कामाला लागा असेही पटोले यावेळी म्हणाले.

प्रदीप माळी

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

4 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

4 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

4 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

4 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

4 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

5 hours ago