राजकीय

मुख्यमंत्र्यांनी विचारले भांडी आणलीत का? : नारायण राणे

टीम लय भारी

मुंबई : दिवाळीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. चिपी विमानतळाच्या उद्धघाटन समारंभावेळी मुख्यमंत्री माझ्या कानात कुजबुजले म्हणाले, भांडी आणली आहेत का ? असे विधान राणे यांनी केले आहे (Narayan Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray).

त्यावेळी मला काही समजले नाही म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो मग त्यांनी सांगितले भांडी फोडणार आहात ना? त्यासाठी भांडी आणली आहेत का? मग मला राग आला मी म्हंटले आता फोडणारच भांडी. त्यानंतर त्यांचा आवाजच बंद झाला असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मजेशीर टीका केली आहे. एका पत्रकाराने नारायण राणे चिपी विमानतळाच्या यांना उद्धघाटन समारंभावेळी मुख्यमंत्री कानात काय बोलले? असा प्रश्न केला असता राणे यांनी उत्तर दिले.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले; विनायक राऊतांनी पेढा दिला

उद्धव ठाकरे – नारायण राणे शेजारी शेजारी, चेहरे मात्र वेगवेगळ्या दिशेला !

त्याचबरोबर मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असा मुख्यमंत्री पहिला नाही. विषय माहित नाही काहीही बोलतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाला उद्धव ठाकरे कलंक आहेत असे म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

After Minister’s Arrest, Rivals Uddhav Thackeray, Narayan Rane Share Stage

कीर्ती घाग

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

5 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

6 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

6 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

6 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

6 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

10 hours ago