32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच मंचावर

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर येणार आहेत. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त ते दोघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे (Uddhav Thackeray and Narayan Rane will come on the same stage).

या लोकार्पण सोहळ्याची तारीख जाहीर झाली असून त्याच्या निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या आहेत. येत्या ९ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळचं लोकार्पण होणार आहे. तसेच त्याच दिवशी १२.३० वाजता चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरु होणार आहे.

स्व. शिवसेनाप्रमुखांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती… : नितेश राणे

आदित्य ठाकरे CBSE आणि ICSE चे शिक्षण मोफत देणार

Uddhav Thackeray and Narayan Rane will come on same stage
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे

या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू व इतर मान्यवर मंडळींची उपस्थिती असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याची स्टेडियमवर भन्नाट पोस्टरबाजी

Lata Mangeshkar turns 92: Narendra Modi, Uddhav Thackeray extend birthday wishes

मात्र चिपी विमानतळावरून ठाकरे आणि राणे यांच्यात वाद पाहायला मिळाला होता. नारायण राणेंनी ७ सप्टेंबर रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी उद्धघाटनाची नवी तारीख जाहीर केली होती. मुख्यमंत्र्यांना विमानतळाच्या उद्घाटनासाठी बोलावणार का? असा प्रश्न राणे यांना विचारला असता त्यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांना बोलावलं पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत, मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही असे राणे म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी