31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयविरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित

विरोधी पक्षांची बंगळुर येथे 17, 18 जुलैला बैठक, 24 पक्ष राहणार उपस्थित

विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुक लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कर्नाटकातील बंगळुर येथे होणार असून ही महाबैठक 17- 18 जुलै अशी दोन दिवस होणार आहे. या बैठकीला सुमारे 24 विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमुख पक्षांचे नेते भेटणार आहेत आणि आगामी निवडणुकांसाठी त्यांच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज संध्याकाळी डिनरला जाणार नाहीत.

या बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट, नॅशनल कॉन्फरस आदी 24 विरोधी पक्ष हजेरी लावणार आहेत. बैठकीच्या सर्व तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आज संध्याकाळी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डिनरला उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या ऐवजी त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डिनरला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या नुकत्याच झालेल्या गुडघ्याच्या मायक्रोसर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. उद्याच्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. तर शरद पवार हे देखील डिनरला उपस्थित राहणार नसून त्यांची कन्या सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. पवार हे सोमवारी मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार असून ते उद्या होणाऱ्या बैठकीस ते सहभागी होणार आहेत.

हे सुध्दा वाचा:

अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

उपसभापती गोऱ्हे यांनी शिवसेना सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या पदावर बसता येणार नाही- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

त्यांची-आमची जुनी ओळख, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

संसदेचे पावसाळी अधिवेशन होत असताना ही बैठक होत आहे. 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बैठक सुरु होईल आणि दुपारी 4 वाजेपर्यंत चालेल. कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व बडे नेते बंगळुरुमधील विरोधी पक्षांच्या महत्तवपूर्ण बैठकीत उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी