34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रप्रा. जोगेंद्र कवाडे किडनीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

प्रा. जोगेंद्र कवाडे किडनीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल

टीम लय भारी 

नागपूर : लाँगमार्चचे प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (People’s Republican Party) राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांना किडनीची समस्या उद्भवल्याने तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना रामदासपेठ येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ७ मार्चला नाशिक येथे पीरिपातर्फे आयोजित विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी ते गेले होते. मात्र प्रकृती ठिक

नसल्याने त्यांना लगेच नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नागपुरात हलविण्यात आल्याचे पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगितले. ८ मार्चपासून कवाडे यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. १९ मार्चपर्यंत पीरिपाचे राज्यातील सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याचेही कळविण्यात आले आहे.

कोण आहेत जोगेंद्र कवाडे

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे  हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते जून २०१४ पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.


हे सुद्धा वाचा 

छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंचा केला सत्कार

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती ; सुधीर तांबे यांची मागणी

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध दारू धंदे, आझाद मैदानात आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी