33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयराहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, मोदी सरकारने देशद्रोह केला

राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, मोदी सरकारने देशद्रोह केला

टीम लय भारी

नवी दिल्ली: पेगाससच्या  मुद्द्यावरून दिल्लीचं राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. अमेरिकेच्या “द न्यू यॉर्क टाईम्सच्या” अहवालावरून काँग्रेसने शनिवारी केंद्रावर हल्ला चढवला ज्यात दावा केला होता की भारत सरकारने इस्रायलशी कराराचा एक भाग म्हणून पेगासस हेरगिरीचे साधन 2017 मध्ये विकत घेतले आणि सरकारने स्पायवेअरचा वापर करून बेकायदेशीर स्नूपिंग केल्याचा आरोप केला जो “देशद्रोह” आहे. ” (Rahul Gandhi’s attack on Modi government)

द न्यूयॉर्क टाईम्समधील अहवालानुसार, इस्रायली स्पायवेअर पेगासस आणि एक क्षेपणास्त्र प्रणाली 2017 मध्ये भारत आणि इस्रायल यांच्यात अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या अंदाजे USD 2-बिलियनच्या कराराचे “केंद्रबिंदू” होते. केंद्रावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, मोदी सरकारने आपल्या लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस विकत घेतले.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश दौऱ्यावरून भारतात परत येण्याची शक्यता

महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण काँग्रेस खपवून घेणार नाही :नाना पटोले

बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीने भाजपला मागे टाकले !

Rift in MVA? 28 Congress corporators join NCP in Maharashtra’s Malegaon

“फोन टॅप करून त्यांनी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका या सर्वांना लक्ष्य केले आहे. हा देशद्रोह आहे,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. “मोदी सरकारने देशद्रोह केला आहे,” असा आरोप त्यांनी हिंदीतून केलेल्या ट्विटमध्ये केला आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट केलं आहे. मोदी सरकारने भारताच्या शत्रू सारखं काम का केलं? भारतीय नागरिकांच्या विरोधातच युद्धाच्या शस्त्रांचा वापर का केला? पेगाससचा वापर बेकायदेशीरपणे हेरगिरी करण्यासाठी करणं हा राष्ट्रद्रोह आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. सर्वांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे, असं खरगे यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या खुलाशावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. इस्रायलची कंपनी एनएसओने 300 कोटीला पेगाससची विक्री केली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येते. हे वॉटरगेट आहे का? असा सवाल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी