राजकीय

Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’

आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. इतिहासातील सुवर्णअक्षरात लिहिलेले असे एक पान ज्याची आठवण आजही अंगावर शहारा आणते. संपुर्ण देशाचा इतिहास पाहायला गेल्यास सगळ्यात प्रदिर्घकाळ चाललेला लढा, संघर्ष म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम. आजचा दिवस खरं तर संपुर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे असे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी संभाजीनगरवर राज्य करणाऱ्या राजकारण्यांवर टीका करत माझ्या संभाजीनगरकरांवर उरावर ही कसली घाण म्हणून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आजच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पत्रकाच्या माध्यामातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व विषद करून त्यांनी आता सध्या संभाजीनगरचे राजकारण, तेथील राज्यकर्ते यांना तुफान शाब्दिक फटकेबाजीने फटकावले आहे. पत्रकात राज ठाकरे म्हणतात, आजचा दिवस खरं तर संपुर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा, कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे म्हणून राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाचे महत्त्व सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

Nandurbar News : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा

Chandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या ‘या’ गोष्टी

राज ठाकरे पुढे म्हणतात, मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळाल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली, पण एकूणच असं वाटतं का ह्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही असे म्हणून विसरलेल्या या सुवर्णपानाची आठवण करून देत खंत व्यक्त केली. पण मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी फारसं कोणी बोललं का जात नसेल. अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्षे राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलात, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते असे म्हणून त्यांनी आधीच्या ठाकरे सरकावर कडाडून टीका केली आहे.

बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजाकार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार… अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजाकार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच…. असो, आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाडयातील जनतेला शुभेच्छा. माझे मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिला तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे असे म्हणून राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देत संभाजीनगरच्या दुर्देशेस ठाकरे सरकार कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’  गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे…

13 mins ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

59 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

15 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

17 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago