29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयChandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या 'या' गोष्टी

Chandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या ‘या’ गोष्टी

मंत्रीपद मिळाल्याने प्रदेशाध्यक्षपद पाटलांना सोडावे लागले. या सगळ्याच बाबतीत नेमकं चंद्रकांत पाटील यांना काय वाटते याची माध्यमांना कमालीची उत्सुकता होती. नुकतीच एका मराठी वृत्तपत्राने चंद्रकांतदादांची मुलाखत घेतली आणि हाच प्रश्न थेटपणे विचारत त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

भाजपनेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपमधील महत्त्वाचे नेते म्हणून गणना होते. राज्यात एकनाथ शिंदे सरकार येण्याआधी चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती, मात्र आता नवं सरकार आल्यानंतर निश्चितच भाजपला महत्त्व प्राप्त झाले आणि भाजपातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपसूकच कॅबिनेट मंत्रीपद चालून आले, परंतु असे असले तरीही मिळालेल्या खात्यावरून पाटील नाराज असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिपद यापैकी तुम्ही कोणाची निवड कराल असे माध्यमांनी विचारताच क्षणाचाही विलंब न करता “पक्ष नेतृत्वासाठी प्रदेशाध्यक्षपद” असे चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिले आहे.

राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले, त्यामध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची असल्याने भाजपातील अनेक नेत्यांना आणखी महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले चंद्रकांत पाटील यांना आता कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलेले आहे, त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रिपद त्यांना देण्यात आलेले आहे. याआधी फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्रालय त्यांनी सांभाळले होते. आता मिळालेले खाते मागच्या खात्यापेक्षा कमी महत्त्वाचे मिळाल्याने चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगत आहेत.

हे सुद्धा वाचा…

Ratnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

UIDAI : युआयडीएआय लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता

Pakistan : पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज लंडनमध्ये स्वखर्चाने उपचार घेतोय

दरम्यान आता मंत्रीपद मिळाल्याने प्रदेशाध्यक्षपद सुद्धा पाटलांना सोडावे लागले. या सगळ्याच बाबतीत नेमकं चंद्रकांत पाटील यांना काय वाटते याची माध्यमांना कमालीची उत्सुकता होती. नुकतीच एका मराठी वृत्तपत्राने चंद्रकांतदादांची मुलाखत घेतली आणि हाच प्रश्न थेटपणे विचारत त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी पक्ष नेतृत्वासाठी प्रदेशाध्यक्षपद असे म्हणून प्रदेशाध्यक्षपदालाच पसंती असल्याचे दर्शवले त्यामुळे आताचे मिळालेले मंत्रिपद म्हणजे चंद्रकांत पाटलांसाठी दोन पावलं मागे येण्यासारखं आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे अनेकांना वाटले होते परंतु खेळी उलटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद भलेही गेले परंतु खातेवाटपात त्यांच्याकडे पुन्हा गृहखाते आले, त्यामुळे त्यांचे थोडक्यात समाधान झाले असेच म्हणता येईल परंतु चंद्रकांत पाटलांच्या बाबतीत परिस्थिती उलट झाली. याआधी त्यांनी महसूल खाते सांभाळले होते त्यामुळे यावेळी सुद्धा त्यांना त्याच तोलामोलाच्या ताकदीचे खाते मिळणे अपेक्षित होते परंतु तसे काहीच घडले नाही, शिवाय आधीचे प्रदेशाध्यक्षपद सुद्धा गेले त्यामुळे त्यांची एकप्रकारे कोंडीच झाली असेच म्हणावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी