33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रNandurbar News : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड

Nandurbar News : तरुणीचा संशयास्पद मृत्यू, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड

मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडून योग्य तो शोध घेण्यात आला नाही त्यामुळे तिचा मृतदेह जतन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे आणखी संभ्रम वाढवणाऱ्या या प्रकरणाला पोलिस आणखी गांभिर्याने घेऊन तपास करतील का आणि पीडितेला न्याय मिळेल का असा सवाल आता वारंवार उपस्थित होऊ लागला आहे.

नंदुरबार जिल्हातील धडगाव तालुक्यात एका 21 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकल्याचा संशय असल्याने तिच्या वडिलांनी तब्बल 44 दिवस पुरलेल्या अवस्थेत मिठाच्या खड्ड्यात ठेवले होते. दरम्यान या तरुणीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात आणला आणि तिच्यावर पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी फॉरेन्सिक तज्ञांनी तरुणीचा मृत्यू रहस्यमयरीत्या झाला असल्याचे अहवालात म्हटले असून तिच्या मृत्यूबाबत अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. एका मिडिया रिपोर्टनुसार, महिलेचा शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत, तिच्या मानेवर बांधून ठेवल्याच्या खूणा आढळून आल्या आहेत, त्यामुळे मृत्यूला कारणीभूत नेमकं काय ठरले आहे याबाबत गुढता आणखीच वाढली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील 21 वर्षीय विवाहित तरुणी मृतावस्थेत सापडली, लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. यावर बोलताना चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा तिचे वडील अंतरसिंग वळवी यांनी केला होता असे पोलिस त्यांच्या तपासात म्हणाले. बलात्काराचा संशय बळावला असल्याने त्या तरुणीच्या वडिलांनी त्या तरुणीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला. तरुणीच्या मृत्यूनंतर नंदुरबारमध्येच तिचे शवविच्छेद करण्यात आले त्यावेळी अहवालात आत्महत्येचे कारण सांगण्यात आले होते.

परंतु या अहवालाने त्या तरुणीच्या वडिलांचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा तिच्या शवविच्छेदन अहवालासाठी तरुणीचा मृतदेह मुंबईच्या जेजे रुग्णालयात आणण्यात आलास परंतु जेजे रुग्णालयाने काही वेगळाच अहवाल दिल्याने या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. या संदर्भात सूत्रांकडून काही माहिती समोर आली आहे त्यानुसार एक हात असलेली व्यक्ती दोरी बांधून स्वत:चा जीव घेऊ शकत नाही हे सहज सांगता येईल. हा मृत्यू संशयास्पद आहे, यात काहीही शंका नाही असे म्हणून त्यांनी तरुणीच्या आत्महत्येचा अहवालाला पुर्ण फेटाळून लावले आहे.

हे सुद्धा वाचा…

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा

Chandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या ‘या’ गोष्टी

Ratnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

दरम्यान, जेजे रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात सुद्धा मृत्यूबाबत फार माहिती देण्यात आलेली नाही तसेच तिच्यावर कोणता लैंगिक अत्याचार झाला का याबाबत सुद्धा काहीच स्पष्टता नाही. यावर सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की, मृतदेह प्लास्टिकच्या शीटमध्ये गुंडाळून मिठाच्या खड्ड्यात ठेवण्यात आला होता. त्यामुळे मृतदेहाचं विघटन पूर्णपणे थांबवलं जाऊ शकत नाही,  यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले की नाही हे अद्याप अनिश्चित राहिले आहे असे म्हणून तरुणीचा मृत्यू गूढ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुलीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांकडून योग्य तो शोध घेण्यात आला नाही त्यामुळे तिचा मृतदेह जतन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे आणखी संभ्रम वाढवणाऱ्या या प्रकरणाला पोलिस आणखी गांभिर्याने घेऊन तपास करतील का आणि पीडितेला न्याय मिळेल का असा सवाल आता वारंवार उपस्थित होऊ लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी