35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयPM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72वा वाढदिवस देशभरात उत्साहात...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 72वा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा

वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकारणापासून अगदी सगळ्याच क्षेत्रांतील दिग्गजांकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदींना देण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस संपुर्ण देशभरातून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भाजप पक्षाकडून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आजच्या दिवशी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8 चित्ते सोडण्यात येणार आहेत, तर भाजप कार्यकर्त्यांकडून आजपासून पुढचे 21 दिवस ‘सेवा आणि समर्पण’ राबवण्यात येणार आहे. ‘सेवा पकवाडा’, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण असा अनेक कार्यक्रमांची आज रेलचेलच पाहायला मिळणार आहे. देशभरातील या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा वाढदिवस ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भाजप पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण देशभरात कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये ‘सेवा आणि समर्पण’ या अभियानाची आजपासून सुरूवात होणार असून पुढचे 21 दिवस ही मोहिम चालू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा विक्रम करण्याचा विचार भाजपच्या मनात आहे म्हणून सदर मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर कोरोना लसीकरणाचे महत्त्व आणखी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Chandrakant Patil : खातेवाटपावरून नाराज चंद्रकांत पाटलांनी कबूल केल्या ‘या’ गोष्टी

Ratnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

UIDAI : युआयडीएआय लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असल्यामुळे ‘सेवा पकवाडा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत गरीबांच्या कल्याणासाठी कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि खासदार अरुण सिंह यांनी दिली आहे, शिवाय रोग्य, रक्तदान शिबिर सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. याचवेळी स्वच्छ भारत अभियानचा सुद्धा नारा लगावण्यात येणार असून आज दिवसभरात अनेक ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. स्वच्छतेशिवाय वृक्षारोपण सुद्धा होणार आहे, यावेळी 10 लाख पिंपळाची झाडे लावण्याचा मानस कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यामातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. राजकारणापासून अगदी सगळ्याच क्षेत्रांतील दिग्गजांकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदींना देण्यात येत आहेत. सध्याच्या राजकीय दिशेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरीही नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य नेतृत्वाला आजही जनमाणसांत स्थान मिळाले आहे, त्यामुळे हीच जमेची बाजू पुढील काळासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी