राजकीय

राज ठाकरे हे भाजपने पाळून ठेवलेले पोपट : संजय राऊत

खारघरमधील दुर्घटनेत उष्माघाताने झालेल्या श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाकाळात निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे उत्तर दिले होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी भाजपने काही पोपट पाळले आहेत, त्यांना बोलू द्या, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राऊत म्हणाले, भाजपने काही पोपट पाळून ठेवले आहेत. या पोपटांना बोलू दिले पाहिजे. नोटबंदीच्या काळात हजारोंच्यावर लोकांना रांगेत उभे ठेवले होते. त्यातील असंख्य लोक मृत्यूमुखी पडले होते. मग तो सुद्धा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा होता. त्याबद्दलही भाजपच्या पोपटांनी बोलण्याची आवश्यकता आहे.

कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह वाहत आले होते. गुजरातमध्ये तर मृतदेह जाळायला देखील जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. राज ठाकरे हे जगाचे नेते आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा: 

कोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्याने राजकीय वातावरण तापले !

नारायण राणे विरोधात संजय राऊत यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Raj Thackeray, Sanjay Raut, BJP, Raj Thackeray is a parrot kept by BJP: Sanjay Raut

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

3 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

3 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

5 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

8 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

8 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

11 hours ago