31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयकोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल

कोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल

जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असा खुलासा केल्यानंतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी विधाने सुरूच ठेवल्यामुळे संतप्त झालेले अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारताच कोण संजय राऊत? असा खोचक प्रतिप्रश्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खुलासा केल्यानंतरही खासदार संजय राऊत यांच्याकडून अजित पवार यांच्याबाबत वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी कोण संजय राऊत ? असा प्रतिप्रश्न केला.

ते म्हणाले, माझ्याविषयी पसरविण्यात आलेल्या बातम्यांबाबत मी बोललो आहे. त्यात कोणाचेही नाव घेतलेले नाही, मी आणि माझा पक्ष याबाबत बोललो. त्यामुळे कोणाला लागायचे काहीच कारण नाही. कोण संजय राऊत ? असा उलट सवालही त्यांनी केला. मी बोलताना कोणाचे नाव घेतलेले नव्हते. तरीदेखील काहीजण अंगावर ओढवून घेतात, त्याला मी काय करू, असेही त्यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा:

जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार : अजित पवार

नारायण राणे विरोधात संजय राऊत यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

नॉट रिचेबल ते 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या; अजित पवार बंड पुकारणार?

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील भेटीविषयी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, गौतम अदानी शरद पवार यांना भेटायला आले होते. पवार यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. दोघांचीही खूप आधीपासूनची ओळख आहे. ही लपविलेली गोष्ट नाही. अदानींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अदानी आणि पवार यांच्या भेटीत काहीच गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar, Sanjay Raut, Ajit Pawar angry on media asking Who is Sanjay Raut

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी