33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयराज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्याने राजकीय वातावरण तापले !

राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्याने राजकीय वातावरण तापले !

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई अंतिम टप्प्यात आली असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

या भेटीत मुंबई शहरातील विविध प्रलंबित मुद्यांसह सध्याच्या घडामोडींवर चर्चा झाली. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने श्री सेवकांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी राजकारण करणे योग्य नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी खारघर दुर्घटनेप्रकरणी संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी कोरोना काळात देखील निष्काळजीपणामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. मग त्यावेळीच्या प्रकरणातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा होता, अशी टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा केली. बीडीडी चाळीतील रहिवाशांना किती चौरस फुटाची घरे मिळतील? त्याठिकाणी शाळा, रुग्णालयाची सुविधा कशी असेल, या मुद्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत संबंधित अधिकारी रहिवाशांपूढे सादरीकरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

13 श्री सेवकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : रेखा ठाकुर यांची मागणी

अखेर सरकारला जाग आली ; खारघर घटनेच्या चौकशीसाठी नेमली एकसदस्यीय समिती !  

सिडकोच्या घरांच्या किमती २२ लाखांवरून ३५ लाखांपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना ही घरे परवडत नाही. त्यामुळे घरांच्या किमती पुन्हा २२ लाखांवर आणा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली, त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याशिवाय पोलिसांच्या घरांविषयी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी