32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयनारायण राणे विरोधात संजय राऊत यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

नारायण राणे विरोधात संजय राऊत यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मी शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, अशी विधाने नारायण राणे यांनी भांडुप येथे आयोजित एका कार्यक्रमात केली होती.

संजय राऊत यांनी याप्रकरणी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती.नारायण राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचे दावे सिद्ध करावेत, असे नोटीसीत म्हटले होते.मात्र,नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी त्यांना आता आपल्या मानहानी प्रकरणी न्यायालयात खेचले आहे.

हे सुद्धा वाचा : 

नारायण राणेंनी राहुल गांधींच्या हाताखाली काम केलेले माहीत नाही का; नितेश राणे यांच्यावर काँग्रेसचा पलटवार

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

गद्दारांना जनताच रस्त्यावर पकडून मारणार : संजय राऊत

Sanjay Raut, Narayan Rane, Sanjay Raut filed a claim for damages against Narayan Rane

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी