31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र, “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलाय”

संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र, “राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागलाय”

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप नेत्यांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे( Sanjay Raut slams BJP, state BJP babbling after drinking a desi).

राऊत म्हणाले आहेत की, ‘वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहीत आहे. तरीही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला ‘वाईन’ चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत. राज्यात मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या सुपर मार्केट किंवा स्टोअरमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार हा निर्णय महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करणारा आहे, असे बोंबलणे म्हणजे स्वतःच्या उरल्यासुरल्या अकलेचे दिवाळे काढण्यासारखे आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सरकारने हा निर्णय घेतला तो शेतकरी, फलोत्पादन करणाऱ्या कष्टकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून, राज्यातील दाक्ष बागायतदार, वाईन उद्योगास चालना मिळावी म्हणून. त्यात नाक मुरडावे असे काय आहे? बरं, देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात बसून या निर्णयास विरोध करावा हे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. पणजीतून त्यांनी सांगितले, ”महाराष्ट्र मद्यराष्ट्र होऊ देणार नाही.” ज्या राज्यात फक्त दारूचेच धबधबे भाजपच्या नेतृत्वाखाली वाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

संजय राऊतांचा आरोप, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू

संजय राऊतांचे पूनम महाजनांना प्रत्युत्तर, दु:ख वाटून घेण्याची गरज नाही

मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का? महापौरांचा भाजपला टोला

‘BJP MP said that liquor is medicine…’: Sanjay Raut defends Maharashtra govt’s decision on wine sale

राज्याचे प्रभारी श्री. फडणवीस आहेत. भाजपशासित सर्वच राज्यांत दारू विक्रीसंदर्भात मवाळ धोरण का स्वीकारले आहे याचाही खुलासा महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. भाजप पुढाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱयांचे उत्पन्न दामदुप्पट करण्याची घोषणा केली आहे, पण उत्पन्न दुप्पट कसे होणार? शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. महाराष्ट्राप्रमाणेच केंद्राचे फलोत्पादन धोरण प्रभावी आहे’, असेही राऊत म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी