31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयsarpanch : पाकिस्तानी महिला झाली उत्तर प्रदेशातील गावची सरपंच; 'अशी' झाली पोलखोल

sarpanch : पाकिस्तानी महिला झाली उत्तर प्रदेशातील गावची सरपंच; ‘अशी’ झाली पोलखोल

टीम लय भारी

मेरठ: पाकिस्तानी महिला उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील एका गावची सरपंच (sarpanch) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ३५ वर्षांपूर्वी महिलेचं गुदारू या गावात लग्न झाले होते. ती भारतात व्हिसावर राहत आहे. पाकिस्तानी नागरिक असल्याची तक्रार केल्यानंतर तिच्याकडे सरपंचपदाचा राजीनामा मागितला आहे. डीपीआरओने या प्रकरणात ग्रामसेवकाला संबंधित महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महिला मूळची पाकिस्तानच्या कराचीत राहणारी असून, बानो बेगम असे तिचे नाव आहे. ३५ वर्षांपूर्वी गावातील अख्तर अलीसोबत तिचं लग्न झालं होतं. ती अद्याप लाँग टर्म व्हिसावर भारतात राहत असून, भारतीय नागरिकत्व अजून मिळालेले नाही. २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत ती सदस्यपदी निवडून आली होती. तर यावर्षी ९ जानेवारी २०२० रोजी सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि बानो बेगम यांना सदस्यांनी प्रभारी सरपंच म्हणून निवडले.

सरपंच झाल्यानंतर कवैदान खाँ यांनी १० डिसेंबरला डीपीआरओ यांच्याकडे महिला पाकिस्तानी असल्याची तक्रार केली. पोलीस तपासात हा आरोप खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बानो बेगम यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला. महिला पाकिस्तानी असून, तिच्याकडे भारतातील मतदान ओळखपत्र, आधार कार्ड असल्याचे स्पष्ट झाले आहे. डीपीआरओंनी ग्रामसेवकांना महिलेविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी