राजकीय

Sharad Pawar : भाजपने एकनाथ शिंदेंना का फोडले, शरद पवारांनी सांगितले कारण

भाजपने शिवसेनेतील प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना फोडून महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्वच संपवले. शिवसेनेच्या गटातून बलाढ्य नेता बाहेर पडल्याने अनेक शिवसेना आमदार आपल्या विवंचना घेऊन त्यांच्या गोटात सामील झाले. दरम्यान राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु मंत्रिमंडळात भाजप नेत्यांना जास्त स्थान मिळाले, या संपुर्ण पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. निवडणुकीच्या वेळी भाजप मित्रपक्षांना सोबत घेतात मात्र निवडणुकीत मित्रपक्षाचे लोक कमी कसे निवडून येतील याची पूरेपूर खबरदारी घेतात, असे म्हणून शिवसेना संपवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडले असावे असे अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकारणानंतर बिहारमध्ये सुद्धा सत्तेची सगळीच सूत्रे हलली असून तिथे भाजप विरोधात मोठा उठाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या परिस्थितीवर बोलताना महाराष्ट्राचे उदाहरण घेत शरद पवार म्हणाले, भाजप पक्षाचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ते निवडणुकीच्यावेळी मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतात. पण त्या निवडणुकीत मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील, याची पुरेपूर खबरदारी भाजपकडून घेतली जाते असे म्हणून भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसा संपवण्याचा डाव साधला जात आहे, जे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये घडतंय असे पवार यांनी कळकळीने सांगितले.

बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी बिहार मधील नितिश कुमार यांनी भाजपला शह देत बिहारच्या राजकारणाची सूत्रेच कशी हालवली याविषयी ते बोलत होते. यावेळी नितेश कुमारांनी अचानक उचललेले पाऊल, भाजपची प्रादेशिक पक्ष संपवण्याची रणनिती आणि महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे षडयंत्र या सगळ्याच मुद्द्यांवर भाष्य करत शरद पवार यांनी माध्यमांसमोर भाजपच्या कुटील राजकारणी महत्त्वकांक्षेचा बुरखा फाडला आहे.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav मराठी कलाकारांचा कार्यक्रम हटवून, अमराठी कार्यक्रमाचे राज्यपालांनी केले उदघाटन !

Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना

Chitra Wagh Vs Sanjay Rathod : चित्रा वाघ यांच्या आरोपावर संजय राठोड यांचे ‘दोन शब्दांचे’ उत्तर !

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे स्पष्टपणे सांगितले होते. नितीश कुमार यांची सुद्धा हीच तक्रार आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते, त्यामुळे नितीश कुमार यांनी उचललेले पाऊल योग्य असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पवार यांनी पंजाबचे उदाहरण दिले ते म्हणाले, पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे असे म्हणून याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर सुद्धा भाष्य केले. पवार म्हणाले, महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. आज भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे? भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र आता बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, असे दुःख शरद पवारांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर अनेक दिवस राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा होत राहिली परंतु या मागचे नेमके कारण माध्यमांसमोर मांडत शरद पवार यांनी इतर राजकीय पक्षांना आता सावधानतेचा इशारा दिला आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

काँग्रेसने पंतप्रधान मोदींना विचारले हे सवाल

आज पंतप्रधान मराठवाड्यात येत आहेत आमचे काही त्यांना प्रश्न: 1. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या  झालेल्या दुरवस्थेकडे पंतप्रधानांचे…

14 mins ago

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

कांदा (onions) काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात…

15 hours ago

वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा (Board exams) घेण्यासाठी ‘लॉजिस्टिक्स्‌’वर काम करावे, यासंदर्भात…

17 hours ago

विठ्ठला तूच’ या चित्रपटाच्या, ट्रेलरने वाढविली प्रेक्षकांची उत्सुकता

खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीस धावून येत आपली मदत करतो. आपलं रक्षण करतो.…

18 hours ago

कडक उन्हामुळे तापाच्या रुग्णांत वाढ! पारा ३९ अंशाच्या पुढे गेल्याने जीवाची काहिली

शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून तापमान वाढत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणावर सण, उत्सव सुरु आहेत.…

18 hours ago

अर्ज भरण्याच्या गर्दीने सर्वसामान्यांना त्रास,भर उन्हात वाहनांच्या रांगा आणि पोलिसांना ताप

सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज (rush to fill…

19 hours ago