राजकीय

Sharad Pawar : शरद पवारांनी केले पक्षांतील नाराज नेत्यांचे मनोमिलन

घर म्हटले की, भांडयाला भांडे लागणारच अशी म्हण आहे. तशीच काहीशी परिस्थ‍िती राजकीय पक्षांची देखील असते. पक्षांतर्गत अनेक नेत्यांमध्ये नाराजी असते. ती वेळीच घालवणे हे कुटुंब प्रमुखाप्रमाणे पक्षप्रमुखाचे काम असते. योग्य वेळी मानातील राग, रुसवे, गैरसमज काढले की, पक्षात फुट पडत नाही. याचे गमक शरद पवार (Sharad Pawar) यांना चांगलेच उलगडले आहे. त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील गैरसमज दूर केले. द‍िल्ली येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिषदेमध्ये ते मतभेद प्रकर्षाने जाणवले. कारण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलण्याची संधी दिल्यामुळे अजित पवार नाराज झाले हाेते.

ते दोन वेळा बाहरे उठून गेले. एकदा सुप्रिया सुळेंनी त्यांना बोलावून आणले अशी मीडियामधे चर्चा होती. परंतु आपण नाराज नसल्याचे अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन शरद पवार यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांचे मनोमिलन केले. या बैठकीला दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी समजूत काढल्याचे समजते. सुमारे 15 मिनीटे ही बैठक सुरू होती.

हे सुद्धा वाचा

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

Chandigarh University : धक्कादायक बातमी ! चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

Fever : तापाची साथ आल्यामुळे पाँडेचेरीमधील शाळा आठ दिवस बंद राहणार

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. तसेच ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे पक्षामध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक पक्षात काही ना काही कुरबुरी होत असतात. त्या वेळीच मिटवणे गरजेचे असते. कारण शिवसेनेतून फूट पडलेल्या शिंदे गटातील प्रत्येक आमदार नाराज असल्याचे सांगतो. तसेच बंडखोरीचे खापर हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर फोडतो. त्यामुळे वेळीच दुरुस्ती केली तर अशी वेळ येणार नाही. प्रत्येक पक्षप्रमुखाने काळजी घेणे गरजे आहे.

रूपाली केळस्कर

Recent Posts

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

2 days ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

2 days ago