28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeएज्युकेशनChandigarh University : चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल...

Chandigarh University : चंदीगड विद्यापीठात एक मुलगीच बनली 60 मुलींची शत्रू, सोशल मीडियावर केलेल्या लाजिरवाण्या कृत्याने 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

पंजाबच्या चंदीगड विद्यापीठामध्ये (Chandigarh University) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. एका विद्यार्थीनीनेच वसतीगृहातील काही व‍िद्यार्थीनींचे आंघोळ करताना व्हिडिओ काढले.

पंजाबच्या चंदीगड विद्यापीठामध्ये (Chandigarh University) माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. एका विद्यार्थीनीनेच वसतीगृहातील काही व‍िद्यार्थीनींचे आंघोळ करताना व्हिडिओ काढले. ते व्हिडिओ ती एका मुलाला पाठत होती. तो मुलगा ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत होता. हे अत्यंत किळसवाणे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. ज्यावेळी विद्यार्थींनीनी इंटरनेटवर हे व्ह‍िडोओ पाहिले त्यावेळी त्यांना प्रचंड मोठा मानस‍िक धक्का बसला. त्यामुळे आठ‍ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण‍ झाले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. ही घटना रात्री उशीरा घडली.

मिळालेल्या महितीनुसार विद्यापीठाच्या गेटवर आज विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा बाजी करत आंदोलन केले. पोलिसांनी एका तरुणाला या प्रकरणी अटक केली आहे. पंजाबच्या मोहाली मधील चंदीगड विद्यापीठात ही घटना घडली. ही विद्यार्थीनी अनेक द‍िवसांपासून हे काम करत होती. तिने सुमारे 60 विद्यार्थीनींचे असे व्हिडीओ बनवले आहेत. ती हे व्ह‍िडीओ बनवून शिमल्याला राहणाऱ्या एका मुलाला पाठत होती. त्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक शिमल्याला गेले आहे.

या प्रकरणी पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी सांगितले की, इंटनेटवरुन हे व्हिडीओ काढून टाकण्यात येतील, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. या प्रकरणात विद्यापीठ प्रशासनावर देखील विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून द‍िली होती. मात्र त्यांनी ही गोष्ट गांभ‍िर्यांने घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला असून, विद्यार्थी न्याय मागत आहेत.

हे सुद्धा वाचा

MNS : भाजपला आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असे सांगून मनसेने प्रचाराचा नारळ फोडला

Impact Player Concept : बीसीसीआयने सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आणली ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ची संकल्पना

Raj Thackeray : ‘माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही कसली घाण’

एका मुलीने इतके घाणेरडे काम करणे ही गोष्ट मुळातच निंदनीय आहे. विद्यार्थीनी मोबाईलचा किती गैरवापर करत आहेत, ते या प्रकरणावरुन आधोरेखीत झाले आहे. विद्यापीठ प्रशासनाने मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे. आपली मुले बाहेर काय करतात याचे पालकांना भान नसते. पालक अनेकदा आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. आपल्याच कामात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांचा मुलांशी सुसंवाद होत नाही. तसेच अफाट होत चाललेल्या तंत्रज्ञानाचे हे वाईट उपयोग सरकारच्या तसेच संशोधकांच्या डोळयात अंजन घालणारे आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी