32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीय‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

टीम लय भारी

मुंबई : ‘पार्थ पवार अपरिपक्व आहे. नातवाच्या वक्तव्याला आपण काडीची किंमत देत नाही’, अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवारचे कान उपटले आहेत. राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेली ही आपटाआपटी ‘महाविकास आघाडी’ सरकार कोसळण्याचे संकेत मानले जात आहेत ( Sharad Pawar scathing to Parth Pawar ).

पार्थ पवारने केलेला खोडसाळपणा हा अजितदादांच्या सांगण्याशिवाय नक्कीच केलेला नाही. पार्थ पवारच्या पाठीमागे अजितदादाच आहेत, हे उघड सत्य आहे. त्यामुळे शरद पवारांनी पार्थ पवारवर नेम साधून अजितदादांना इशारा दिला आहे.

lay bhari

गेल्या वर्षभरात अजित पवार भाजपकडे पूर्णपणे झुकले आहेत. यापूर्वी झालेल्या विविध घटनांमध्ये पवारांनी अजितदादांना सावरून नेले होते. पण पार्थ पवारच्या प्रकरणात डोक्यावरून पाणी जाऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी पार्थ पवारचे थेट कान टोचून अजित पवारांना इशारा दिल्याचे बोलले जात आहे. ‘तुम्हाला फार गोंजारून झाले. तुमचे आता फार लाड केले जाणार नाहीत’ असाच संदेश त्यांनी अजित पवारांना दिल्याचे बोलले जात आहे ( Sharad Pawar upsate on Ajit Pawar ).

‘महाविकास आघाडी’तील ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

भाजपने सत्ताधारी पक्षांतील ४० ते ४५ आमदार फोडण्याची तयारी केली आहे. यांत राष्ट्रवादी व काँग्रेसचे ३५, तर शिवसेनेच्या १० आमदारांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली ( 45 MLAs in contacts with BJP ). विशेष म्हणजे, डझनभर मंत्र्यांचाही यात समावेश असल्याचे या सूत्रांनी ‘लय भारी’ला सांगितले.

‘कोरोना’ लसीचे आगमन ठरणार मुहूर्त

ज्यावेळी ‘कोरोना’ची लस महाराष्ट्रात दाखल होईल, त्यावेळी भाजप ‘महाविकास आघाडी’ला खिंडार पडेल असेही या सूत्रांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. या वातावरणात सरकार पाडून जनतेची नाराजी ओढवून घेण्याची भाजपची तयारी नाही. गेले काही दिवस ‘महाविकास आघाडी’ सरकारबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती होती.

पण ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यात ‘महाविकास आघाडी’ सरकारला यश येत नाही. ग्रामीण भागातही ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. ‘कोरोना’ घराघरात शिरकाव करू लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये सरकारप्रती नाराजी वाढत असल्याचे भाजपच्या नेत्यांचे निरीक्षण आहे ( BJP’s efforts to derail Mahavikas Aghadi government ).

Mahavikas Aghadi

अशा परिस्थितीत सरकार पाडण्यासाठी ‘कोरोना’ लसीचे आगमन हा मुहूर्त योग्य ठरेल असे भाजपच्या चाणक्यांचे मत आहे. भाजपच्या गळाला लागलेल्या ४० – ४५ आमदारांना तयारीत राहण्याचे संदेश दिले आहेत.

राष्ट्रवादीतून अजितदादा एक मोठा गट घेऊन भाजपच्या तंबूत दाखल होतील असेही या सूत्रांनी सांगितले. ज्या आमदाराकडे पुन्हा निवडून येण्याची क्षमता आहे, असेच आमदार भाजपच्या गळाला अडकले असल्याचे सूत्रांनी सांगितले ( Ajit Pawar on the way to BJP ).

अजित पवार शरद पवारांच्या बंगल्यावर

या बातमीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अजित पवार यांना बंगल्यावर पाचारण केले आहे. या बैठकीत अजित पवारांच्या मनातील भावना शरद पवार जाणून घेतील. पार्थ पवारच्या वक्तव्यांमागील अर्थ, तसेच भाजपकडे झुकलेली त्यांची भूमिका याबाबत चर्चा करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी