28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रAmravati News : 'ते' दोघे दर्ग्याच्या आवारात झोपले आणि....

Amravati News : ‘ते’ दोघे दर्ग्याच्या आवारात झोपले आणि….

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील दडबडशहा दर्ग्याच्या आवारात दोन इसम रात्रीच्या वेळी झोपले होते, परंतु रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. सदर घटना सकाळी उघडकीस आली.

अमरावती जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दर्ग्याच्या परिसरात झोपलेल्या दोन व्यक्तींवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा गळा चिरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या घटनेने आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली असून यात दोन्ही इसमांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या क्रुर हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी याबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हत्या कोणी, का केली असावी असा सवाल स्थानिकांकडून आता उपस्थित करण्यात येत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील दडबडशहा दर्ग्याच्या आवारात दोन इसम रात्रीच्या वेळी झोपले होते, परंतु रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. सदर घटना सकाळी उघडकीस आली. मुजावर अनवर (वय ५०, रा. लाल खडी) आणि तौसीफ खान (वय २५ रा. कारंजा) असे या घटनेत दुर्देवी मृत्यू झालेल्या इसमांची नावे आहेत. या घटनेचे कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासास सुरवात केली आहे.

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

Eknath Shinde : शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदेंनी लिहिले केंद्र सरकारला पत्र!

Vedanta Foxconn Project : ‘वेदांता प्रकरणात पेंग्विनसेनेकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

घटनास्थळी लोणी व बडनेरा येथील पोलीस दाखल झाले असून सदर घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. दरम्यान या हत्याकांडाचे कोणतेच कारण अद्याप समजू शकलेले नाही. अज्ञात हल्लेखोर सुद्धा अजूनही पसारच आहेत त्यामुळे या घटनेवर स्थानिकांकडून वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे बडनेरा परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

या घटनेनंतर समाजमाध्यमांमधून सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून सदर घटनेचा खडानखडा तपास करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. अत्यंत क्रुरपद्धतीने दोन्ही इसमांना मारल्यामुळे पोलिसांपुढे सुद्धा तपासात पेच निर्माण झाला आहे त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं असावं हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी