34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या झोपेवर‍ अजित पवारांचा सवाल !

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या झोपेवर‍ अजित पवारांचा सवाल !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि व‍िरोधी पक्ष नेते अजित पवार आज जळगाव जिल्हायातील पाचोरा येथे बोलत होते. आज त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पैठणच्या सभेतील वक्तव्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि व‍िरोधी पक्ष नेते अजित पवार आज जळगाव जिल्हायातील पाचोरा येथे बोलत होते. आज त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पैठणच्या सभेतील वक्तव्यांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. आजित पवार हे सकाळी 6 वाजता कामाला सुरूवात करतात, असे सुप्रिया सुळे आपल्या भाषणामध्ये पूर्वी बोलल्या होत्या. त्यावर एकनाथ शिंदे पैठणमध्ये म्हणाले की, आम्ही तर पहाटे 6 वाजेपर्यंत काम करतो. मुख्यमंत्री जर पहाटे 6 वाजेपर्यंत काम करतात. मग ते झोपतात तरी कधी असा प्रश्न अजित पवार यांना पडला आहे.

कारण बहुसंख्य माणसं ही रात्री झोपतात आणि पहाटे लवकर उठून प्रात:विधी अटोपून कामाला लागतात. मुख्यमंत्री नेमके याच्या उलटे वागत आहे. त्यामुळे अजित पवारांनी‍ आपल्या मिश्किल शैलीत टोले बाजी केली. मुख्यमंत्री 6 वाजेपर्यंत जागतात. मग झोपतात कधी. कधीतरी मेंदू म्हणेल झोप पाहिजे. प्रत्येक माणसाला उत्तम आरोग्यासाठी 6 तास झोप आवश्यक असते. हे सांगतांना त्यांनी शरद पवारांचे उदाहरण दिले. आम्ही साहेबांना 55 वर्षे राजकारणात पाहत आलो आहोत. अनेक वेळा रात्री 2 वाजता झोपून देखील ते सकाळी 6-7 वाजता तयार असतात. मला तर रोज सकाळी लवकर उठायची सवय झाली आहे.

अजित पवार यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. ते म्हणतात हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. हे कशाचं सर्वसामान्याचे सरकार आहे. पोलीस खात्याला काय म्हणतात. कोणी कोणाला आवरायला तयार नाही. इथे सगळेच मुख्यमंत्री आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगतात. त्यांच्या या विधानाचा देखील अजित पवार यांनी समाचार घेतला. 40 मुख्यमंत्री आहेत मग‍ आधिकाऱ्यांनी ऐकायचे कोणाचे. नियम वगैरे काही आहेत की, नाही. उचलली जीभ लावली टाळयाला ! अशा मुख्यमंत्री शिंदेंच्या बोलण्यामुळे राज्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. राज्याच्या एक ना अनेक प्रश्नांचा आज अजित पवार यांनी आपल्या भाषणांमध्ये आढावा घेतला. आपल्या साख अशा रोखठोक शैलीत त्यांनी सरकारला फैलावर घेतले.

हे सुद्धा वाचा

Amravati News : ‘ते’ दोघे दर्ग्याच्या आवारात झोपले आणि….

Ajit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले

Vedanta Foxconn Project : ‘वेदांता प्रकरणात पेंग्विनसेनेकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

हे सरकार महागाईवर बोलत नाही. बेरोजगारीवर बोलत नाहीत. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते प्रयत्न करतात. पन्नास खोके एकदम ओके बोलल्यावर त्यांना राग येतो. डायरेक्ट सरपंच, जिप.अध्यक्ष निवडीच्या निर्णयावरुन देखील धारेवर धरले. स्वत:ला सोईचे असेल ते करायचे. इथे पाचोऱ्यामध्ये तर नगरअध्यक्ष एका पक्षाचा बॉडी दुसऱ्या पक्षाची आहे. या गोष्टी लोकशाहीला मारक आहेत. यावरून मला तर वाटतं जळगावचं मीठ आळणी तर नाही ना ! यापूर्वी जे दिग्गज नेते शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांना लोकांनी निवडून दिले नाही. लोकांना तसे नेते आवडत नाहीत. राज्याच्या हितासाठी आम्ही काम करत राहणार आहेत याची ग्वाही त्यांनी यावेळी जळगावकरांना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी