Sujay Vikhe Patil : ‘सुजय विखे पाटलांचे प्रेम सनी लियोनी…’

डॉ. सुजय विखे – पाटील (Sujay Vikhe Patil) हे भाजपचे खासदार आहेत. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे – पाटील यांना महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे विखे पाटील कुटुंबांमध्ये आनंदी आनंदाचे वातावरण आहे. डॉ. सुजय विखे – पाटील यांच्याकडून तर वारंवार भाजप (BJP), नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याविषयी स्तुतीसुमने उधळली जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर विखे – पाटील वारंवार टीका करताना दिसत आहेत. असे असले तरी विखे – पाटील कुटुंब हे मुळचे काँग्रेसचे आहे. त्यामुळे सुजय विखे – पाटील यांना भाजपविषयी अचानक प्रेमाचे भरते आल्याने लोकांनाही अजब वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सुजय विखे – पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Mahadev Jankar : धनगर समाजातील मुलांना राज्य सरकारकडून मिळणार ‘या’ सवलती

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी विखे – पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. सुजय विखे पाटील यांच्या तोंडून भाजपबद्दलच्या समर्पणाची भाषा ऐकल्यावर ‘चारित्र्य कसं जपावं’ यावर मार्गदर्शन ऐकल्यासारखे वाटते, अशा शब्दांत सुरज चव्हाण यांनी विखे – पाटील यांची खिल्ली उडविली आहे.

सनी लियोनी (Sunny Leonee) ही हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आहे. परंतु ती मुळची अश्लिल (पॉर्न) चित्रपट अभिनेत्री आहे. पंजाबी असलेली सनी लियोनी कॅनडामध्ये लहानाची मोठी झाली. मोठी झाल्यानंतर तिथेच ती पॉर्न चित्रपटांमध्ये काम करू लागली. पण त्यानंतर तिला महेश भट्ट यांनी पहिल्यांदा हिंदी चित्रपटामध्ये काम दिले. हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा ती बिनधिक्कतपणे उत्थान दृश्ये देत असते.

सनी लियोनीच्या अंगप्रदर्शनाची नेहमीच खिल्ली उडविली जाते. त्या पार्श्वभूमीवर सुरज चव्हाण यांनी डॉ. सुजय विखे – पाटील यांच्या भाजपप्रेमाला सनी लियोनीच्या चारित्र्याची उपमा दिली आहे. विखे पाटील यांचे कुटुंबिय मुळचे काँग्रेसचे. बाळासाहेब विखे – पाटील व राधाकृष्ण विखे – पाटील यांना काँग्रेसनेच मोठे केले. असे असले तरी सत्ता असते त्या पक्षात विखे – पाटील सामील होत असतात. ही त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

काँग्रेस – शिवसेना – काँग्रेस – भाजप असा विखे पाटील कुटुंबाचा प्रवास झाला आहे. विखे – पाटील कुटुंबियांना सर्वाधिक फायदा काँग्रेसनेच करून दिलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असताना त्यांना कृषी, परिवहन, शिक्षण, सहकार व पणन, विधी व न्याय, विधान सभेचा विरोधी पक्षनेता अशा अनेक पदांवर जवळपास २० वर्षे काम करण्याची संधी मिळाली होती.

सन २०१९ मध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिला. त्यामुळे विखे – पाटील पिता पुत्रांनी सरळ भाजपमध्ये प्रवेश केला. विखे पाटील यांना त्यावेळी भाजपने गृहनिर्माण खात्याचे मंत्री सुद्धा बनविले होते. त्यानंतर आता महसूल मंत्री बनविले आहे.

तुषार खरात

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

13 mins ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

56 mins ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

1 hour ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

1 hour ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

2 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

5 hours ago