29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हयातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट सापडली आहे. या प्रकरणामुळे निलेश राणेंनी सरकारचे कान उपटले आहेत. या सापडलेल्या संशयास्पद बोटी विषयी सुरक्षा यंत्रणेला काहिच माहिती नाही ही दुदैवी गोष्ट असल्याचे ट्विट भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या बोटीवर फ्रीज सापडले आहे. त्यात जेवण होते. ते चांगले होते. मग त्या बोटीवरील व्यक्ती कुठे पळाले. हे प्रकरण हलक्यात घेऊन चालणार नाही. या संशय‍ित बोटी विषयी कोणालाही पुरेशी माहिती नाही. त्या बोटीवर कोण होते ते अगोदरच सटकले आणि अजून सापडले नाही. बोटीवर सापडलेल्या सामानावरुन या प्रकरणाची चौकशी गंभीरपणे झाली पाहिजे.

गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर या पर्यटनस्थळी समुद्र किनाऱ्यावर सुमारे 16 मिटर लांबीची बोट सापडली. त्यात तीन एके 47 रायफल आणि काडतूसे होती. ही बोट ऑस्ट्रेलियन नागर‍िकाची असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईवर 26/11 सारखा दहशवादी हल्ला करण्याची धमकी पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण कदाचित गंभीर असू शकते. दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर या दोन्ही घटना घडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने आता गाफील राहून चालणार नाही.

हे सुद्धा वाचा

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

tomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

या संशयास्पद बोटीचे नाव लेडी हान असून, तिची मालकी ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. या बोटीत सापडलेली रायफल, स्फोटके आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

गेले दोन महिने राज्यात नीट सरकार नव्हते. राज्याची सुरक्षा रामभरोसे होती. त्यामुळे दहशवादी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात मुंबई हे महत्वाचे शहर असल्यामुळे ते नेहमीच दहशतवादयांच्या निशाणावर राहिले आहे. राजकारण्यांच्या भांडणांमुळे एकूण राज्याची सुरक्षा धोक्यात आली आहे असे म्हणले तर ती अतिशोक्ती होणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी