33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयकेंद्राच्या अखेरच्या इशाऱ्याला ट्विटरने दिला सकारात्मक प्रतिसाद!

केंद्राच्या अखेरच्या इशाऱ्याला ट्विटरने दिला सकारात्मक प्रतिसाद!

टीम लय भारी

मुंबई :- केंद्र सरकारने (Central Government) सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू केले आहेत. भारतात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात केंद्रा सरकारने (Central Government) नोटीस बजावली होती. परंतु त्याला नकारार्थी प्रतिसाद देत तीन महिने टाळटाळ केल्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) ट्विटरला (Twitter) सोशल मीडिया कंपनीला अखेरची नोटीस पाठत माहिती-तंत्रज्ञान आणि फौजदारी कायद्यानुसार कारवाईचा इशारा दिला होता. त्यावर ट्विटरने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ट्विटर भारतासोबत पुर्णपणे कटिबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

केंद्र सरकारने (Central Government) सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू केले आहेत. फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ मेपर्यंत भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करणे अनिवार्य होते. इतर सोशल मीडिया कंपन्यांबरोबरच ट्विटरलाही (Twitter) यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात आली होती, पंरतु ट्विटरने (Twitter) नियम पालनास नकार दर्शवला. त्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) ट्विटरला (Twitter) अखेरची नोटीस बजावली होती. नियमांचे पालन केले नाही, तर आयटी कायद्यान्वये ट्विटरला (Twitter) दायित्वातून देण्यात आलेली सवलत गमवावी लागेल, असा इशाराही केंद्र सरकारने (Central Government) दिला.

पेट्रोल-डिझेलची भाववाढ मागे घ्या नाहीतर मोठे आंदोलन करु, पटोलेंचा इशारा

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस सतर्कतेचा इशारा

Coronavirus: India’s daily cases drop below 1 lakh for first time in over two months

केंद्राच्या नोटिशीला आता ट्विटरकडून (Twitter) उत्तर देण्यात आले आहे. “भारतासोबत ट्विटर (Twitter) पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि राहिल. नवी नियम आणि सूचनांचे पालन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन आम्ही भारत सरकारला दिले आहे. त्या दिशेने करत असलेल्या कामाचा कायदेशीर आढावा आम्ही सरकारलाही दिला आहे. भारत सरकारसोबत आमचा संवाद सुरू ठेवू,” असे ट्विटरने (Twitter) म्हटले आहे.

ट्विटरच्या नकारावर केंद्राने व्यक्त केली होती नाराजी

ट्विटरने (Twitter) सुरूवातीला नियमांचे पालन करण्यास नकार दिला होता. त्यावर केंद्र सरकारने (Central Government) नाराजी व्यक्त केली होती. भारतातील नागरिकांना आपल्या व्यासपीठावर सुरक्षितता देण्याबाबत ट्विटर (Twitter) प्रयत्नशील दिसत नाही किंबहुना ट्विटरची (Twitter) तशी बांधिलकीही नसल्याचे निदर्शनास येते, असे भाष्य माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केले होते. भारतात एका दशकाहूनही अधिक काळ ट्विटर (Twitter) कार्यरत आहे. परंतु, ट्वीटरने (Twitter) भारतातील नागरिकांच्या तक्रारी एका कालमर्यादेत आणि पारदर्शकतेने दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यास ठाम नकार दिला. ही बाब न पटणारी आहे, असे मंत्रालयाने म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी