राजकीय

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये दुप्पट वेगाने काम केले : उद्योग मंत्री उदय सामंत

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे सर्वच विभाग उद्योगांनी व्यापले पाहिजेत, येथील युवा पिढीला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आमचा दावोस दौरा महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीने राज्यातील (Maharashtra) जनतेची, युवकांची अपेक्षा होती त्यात आम्ही य़शस्वी झालो आहोत, जनतेच्या आशीर्वादाने शिंदे-फडणवीस सरकार उद्योग जगताला आहे त्याहून अधिक उभारी देईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदे दरम्यान (Davos World Economic Conference) बुधवारी (दि.१८) रोजी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी फेसबुक लाईव्हव्दारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मंत्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जवळपास ३० तास दोवोसमध्ये होते. मुख्यमंत्री जसे राज्यात जसे काम करतात त्याहून अधिक जलद गतीने त्यांनी दावोसमध्ये काम केले. अवघ्या दोन दिवसांमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे गुंतवणूक करार आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांसोबत केले. त्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे १ लाख रोजगार निर्मान होणार आहेत. काँग्रसेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण राज्यातील उद्योग जगत आणि सर्वांगिन विकासाला दिशा देणारे भाषण होते, असे देखील मंत्री सामंत यावेळी म्हणाले. (Uday Samant Said CM Eknath Shinde acted at double speed in Davos World Economic Conference)

मगील वर्षीच्या सामंजस्य कराराचे काहीच झाले नाही!
मागच्या वर्षी सुमारे ३० हजार कोटींचे सामंजस्य करार झाले होते. ५० हजार कोटींचा उर्जा क्षेत्राशी संबंधीत सामंजस्य करार झाला होता. ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारासंबंधी अद्याप महाराष्ट्रात काहीच झालेले नाही. ३० हजार कोटींपैकी एफडीआय गुंतवणूक किती होती हे देखील प्रश्न चिन्ह आहे. मात्र आज दावोसमध्ये जे सामंजस्य करार केलेले आहेत हे जास्तीजास्त एफडीआयवरचे आहेत, असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.

रायगडमध्ये डेटा सेंटर
मंत्री सामंत म्हणाले, अमेरिकेतील बर्कशायर ही कंपनी रायगडमधील पेण येथे डेटा सेंटर उभारणार आहे. ही कंपनी १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून १५ हजार नोकऱ्या निर्मान होणार आहेत. बोगोरो इंडीया इव्ही बॅटरी आणि ५ हजार चॅर्जिंग सेंटर राज्यभरात उभारणार आहेत. २० हजार कोंटींचा हा प्रोजेक्ट असून ३० हजार नोकऱ्या निर्मान होणार आहेत. ग्रीनको एनर्जी ही सोलार आणि हायड्रो निर्मान करणारी कंपनी १२ हजार कोटींची गुंतपणूक करणार असून ६ हजार ३०० नोकऱ्या यातून निर्मान होणार आहेत. आयसीपी इनव्हेस्टमेंट इंडस कॅपिटल ही व्हेईकल टेक्निकल पार्ट महाराष्ट्रात बनविणार आहे. ही कंपनी १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून १५ हजार नोकऱ्या राज्यात निर्मान होणार आहेत.

महिंद्रा इलेक्ट्रिकल ही कंपनी इव्ही कारमध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून तसेच ६ हजार कोटींचा विस्तार देखील ही कंपनी करणार आहे. या कंपनीच्या १० हजार कोटींच्या गुंतवणूकीतून ६ हजार नोकऱ्या आणि उद्योग विस्तारातून २ हजार नोकऱ्या निर्मान होणार आहेत. न्यू एरा इंटेक गॅसीफिकेशनचा प्रकल्प विदर्भात होत असून २० हजार कोटींची गुंतवणूक ही कंपनी करणार असून १५ हजार नोकऱ्या निर्मान होणार आहेत. निकॉन टेलिग्राम कंपनी मुंबई, पुणे, नागपूर येथे डाटा सेंटर उभारणार असून ही कंपनी २० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून १५२५ नोकऱ्या निर्मान होणार आहेत. लग्झेंबर इन्हेस्टमेंट ही डाटासेंटर मध्ये गुंतवणूक करत असून १२ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून १२०० नोकऱ्या त्यातून निर्मान होणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

रत्नागिरीत स्टील (लोखंड) उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील
स्टील उद्योगातील अग्रणी असलेले उद्योगपती मित्तल हे देखील मुख्यमंत्र्यांना भेटले. आम्ही त्यांना रत्नागिरीत उद्योग उभारण्यासाठी विनंती केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच आज अमेरिकेतील इलेक्ट्रिकल व्हेईकल बनविणाऱ्या एका कंपनीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारण्यासाठी विनंती केली आहे. बंदर विकासासंबंधित काही प्रोजेक्ट आहेत ते देखील करण्याचा निर्णय आम्ही दावोसमध्ये घेतलेला आहे. आम्ही नुसते करार करुन थांबणार नाही तर त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि राज्यातील एक लाख तरुणांना रोजगार कसा मिळेल प्रयत्न करणार आहोत.

हे सुद्धा वाचा

दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सिस्टर आंद्रे यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन

सामनामध्ये विकिपिडीयावरुन कॉपी पेस्ट करणारे संपादक; चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर बोचरी टीका

सौदी अरेबिया खाण उद्योगात गुंतवणुकीसाठी उत्सुक
लेग्झंबरचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना भेटले त्यांनी देखील भारत आणि महाराष्ट्राशी उद्योगाचे नाते जोडण्याबाबत चर्चा केली. सिंगापूरचे पंतप्रधानांची भेट झाली. सौदी अरेबियाच्या शिष्टमंडळाला आम्ही भेटलो. त्यांनी देखील खाण उद्योगामध्ये गुंतवणूक उत्सुक असल्याचे सांगितले. फिलिप्सने देखील मेडीकल डिव्हाईस पार्क उभारण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. बर्कले विद्यापीठासोबत कौशल्य विकासाचा सामंजस्य करार केला. वर्ल्ड इकोनॉमी फोरममध्ये देखील दोन सामंजस्य करार झाले.

जर्मनी दौऱ्यात ३०० कोटींच्या गुंतवणूकीबाबत सकारात्मकता
यावेळी सामंत म्हणाले, नुकतीच मी जर्मनीत ट्रम्प, लॅप कंपनीला भेट दिली. त्यांना राज्यात गुंतवणूक करण्यास निमंत्रण दिले, त्या कंपन्यांचे प्रतिनिधी लवकरच महाराष्ट्रात भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यांनी ३०० कोटींचे आश्वासन दिले. तसेच आज देखील माझ्या उपस्थितीत जपान आणि कोरिया देशांतील कंपन्या कोकणात उद्योग उभारण्यासाठी उत्सुक आहेत, सोलार सारखा प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यात उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

प्रदीप माळी

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

3 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

3 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

6 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

7 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

8 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

8 hours ago