32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeव्यापार-पैसादावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक

दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक

जागतिक आर्थिक परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार; राज्यात मिळणार एक लाखांहून अधिक नोकऱ्या; नॉलेज पार्टनरशिपसाठी कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले) समवेत करार

दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या ठाकरे सरकारच्या दुप्पट गुंतवणूक खेचून आणली आहे. या परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आले. (CM Eknath Shinde Brought Double Investment In Maharashtra At Davos World Economic Conference Thakre Sarkar Beaten By Shinde MoU For 1.37 Lakh Crore) त्यातून राज्यात एक लाखांहून अधिक नोकऱ्या मिळणार आहेत. ठाकरे सरकारने गेल्यावर्षी 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या परिषदेतून मिळविली होती. महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले) समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करारही दावोस परिषदेत करण्यात आला.

गेल्या दोन दिवसांत दावोस येथे विविध उद्योगांशी सुमारे 1 लाख 37 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. दावोसमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे करार झाले. त्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

पायाभूत आणि हायटेक सुविधा क्षेत्रात 54 हजार 276 कोटी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत 54 हजार 276 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे 4,300 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
इलेक्ट्रीकल व्हेईकल आणि ऊर्जा क्षेत्रात 46 हजार 800 कोटी
ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात 46 हजार 800 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून 45 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण तसेच  उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उद्योजकांना संधी आहे. दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली. त्यातून प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राचे करार झाले. देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे यामुळे दिसते. या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील. त्यांचे मी आभार मानतो.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

आयटी, डेटा सेंटर, फिनटेक या क्षेत्रात 33 हजार 414 कोटी
माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये 32 हजार 414 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून 8,700 जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात 2,200 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 3,000 जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये 1,900 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे 600 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण
राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवीन धोरणात एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नवीन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

#दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत विविध उद्योगांची गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती. १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या – मुख्यमंत्री @mieknathshinde यांची माहिती#Davos #WorldEconomicFourm pic.twitter.com/NRbtvUgjmA

महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी विश्वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले व उद्योजकांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी आहे. दावोसमध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो.
CM Shinde Davos Return to Mumbai CM Eknath Shinde Brought Double Investment In Maharashtra
स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेत (WEF) सहभागी होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यात परतले. मुंबई विमानतळावर आगमन होताच मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार, आमदार, पदाधिकारी, सहकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उड्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासाठी दावोस परिषद सोडून मुख्यमंत्री मुंबईत परतले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीसाठी गुंतवणूक परिषदेलाच दांडी मारली.

सामंजस्य करारांची एकत्रित माहिती

  1. पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूक
  2. पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
  3. पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
  4. मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक
  5. औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार)
  6. चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार)
  7. चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)
  8. गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)
  9. महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार)
  10. महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक
  11. महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार)
  12. लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार)
  13. हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार)
  14. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदे दावोसमध्ये जाऊन ठाकरेंवर करणार मात !

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथे राज्याची ८० हजार कोटींच्या करारांवर स्वाक्षरी

Good News : नवी मुंबई मेट्रोचे 19 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन !

नॉलेज पार्टनरशिपसाठी करार

दावोस येथे महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी देखील खालील सामंजस्य करार करण्यात आले.

  1. मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
  2. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
  3. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी साठी सामंजस्य करार
  4. स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार
Double Investment In Maharashtra At Davos World Economic Conference, Thakre Sarkar Beaten By Shinde,, CM Eknath Shinde Brought Double Investment, MoU For 1.37 Lakh Crore, दावोस जागतिक आर्थिक परिषद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी