राजकीय

Udyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची जळजळीत टीका

रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा अशी जळजळीत टीका खासदास छत्रपती उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली. या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra Chief Minister) असावा, असं ठरलंय मग यांनी अचानक असा का बदल केला, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. सोमवारी रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर एक आंदोलन झाले, यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.

उदयनराजे म्हणाले,  ज्यांचं काही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतले जाते. राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. त्यावेळी मी लहान होतो. कर्मवीर अण्णा आणि सुमित्राराजे हे नेहमी समाजासाठी कार्यरत होते. अशा गोष्टी नेहमी माझ्या कानावर पडत. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतु राहिला आहे असं वाटत नाही. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असावा, हे ठरलंय. मग असं काय घडलं की त्यांनी एकदम बदल केला.? बदल करणारे हे कोण? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा –

Maitreya Scam Update : मैत्रेय विरोधातील लढ्यासाठी नागरिकांची गांधीगिरी; राज्यभरात धरणे आंदोलन

Eknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण…

Mumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम बघून आरपीएफही दंग

‘यांनी फक्त ओढलंय’ –

ज्या लोकांचं काही योगदान नाही. तुम्ही त्यांना घेतलं नाही. हे घेणारे कोण? आम्ही दिलंय. यांनी काय दिलंय? यांनी फक्त ओढलंय… एवढं सगळं केलंय तर मग रयतचं नाव बदलून टाका. संख्या ज्याची जास्त आहे. त्याचा पक्ष.. ते इथं पण लागू करा. ज्या कुटुंबाची संख्या जास्त… पवार कुटुंबाची (Pawar Family) आहे… मग पवार शिक्षण संस्था नाव देऊन टाका… आज इथल्या लोकांच्या वेदना तुम्ही ऐकून घेणार आहात का? अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नावाजलेल्या पवार कुटुंबीयांवर केली.

टीम लय भारी

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

5 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

5 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

6 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

6 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

8 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

8 hours ago