27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMaitreya Scam Update : मैत्रेय विरोधातील लढ्यासाठी नागरिकांची गांधीगिरी; राज्यभरात धरणे आंदोलन

Maitreya Scam Update : मैत्रेय विरोधातील लढ्यासाठी नागरिकांची गांधीगिरी; राज्यभरात धरणे आंदोलन

मैत्रेयच्या विरोधात लढा पुकारणारे अनेकजण आता आणखी आक्रमक झाले असून  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्यभर धरणे आंदोलनाची हाक दिली.

नागरिक आपल्या उज्वल भविष्यासाठी सध्या कमावलेला पैसा कोणत्यातरी विश्वासू ठिकाणी गुंतवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे यासाठी त्यांना आजच्या आधुनिक जगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच एक पर्याय म्हणून काही दिवसांपूर्वी ‘मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा होता. या कंपनीने आधी नागरिकांचा विश्वास आत्मसात केला. त्यानंतर नागरिकांनी कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर कंपनीने मोठा घोटाळा केला. महाराष्ट्रातील तब्बल लाखो लोकांचे यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. या नागिरकांना अद्याप कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. यासाठीच मैत्रेयच्या विरोधात लढा पुकारणारे अनेकजण आता आणखी आक्रमक झाले असून  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्यभर धरणे आंदोलनाची हाक दिली. यामध्ये नानासाहेब पाटील, विठू दर्डा, राजेंद्र देवरे, यासीन सय्यद, पुष्पा पाटील, अनिता पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.

हे सुद्धा वाचाा

INDvsSA T20I : सूर्याच्या फटकेबाजीमुळे रोहितने रचलाय इतिहास; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय कर्णधार

Smart TV Deal : हुर्रे! फक्त दोन हजारांत मिळणार ‘हा’ मोठा स्मार्ट टिव्ही

Annu Kapoor Fraud Case : अभिनेते अन्नू कपूर यांना चोरट्याने फसविले

ऑल इंडिया मैत्रेय उपभोक्ता एवं अभिकर्ता असोसिएशन कडून सर्व मैत्रेय पीडित प्रतिनिधींसाठी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे निमित्त साधून ‘मैत्रेय’ प्रकरणातील मागणीसाठी पिडीत प्रतिनिधींकडून प्रत्येक तालुका व जिल्हा ठिकाणी महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडून सर्व पीडित ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या परताव्याची रक्कम सत्वर वाटप व्हावी अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदने दिली.

महाराष्ट्रातील केवळ एक- दोन नाही तर तब्बल 32 जिल्ह्यांमध्ये मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड या कंपनीने दाम-दुप्पट आणि मुदत ठेवीला 11 टक्के व्याजदराचे आमिष दाखवत नागरिकांना सपशेल लुटले आहे. मैत्रेयने आमिष दाखवताच अनेक सर्वसामान्य आर्थिक विवंचनेतून झटपट बाहेर पडता येईल म्हणून भाळून गेले. लोकांनी कोणताच विचार न करता मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, कोणी आयुष्यभराची कमाई असे सगळेच पैसे दामदुप्पटीने मिळतील म्हणून मैत्रेयच्या स्वाधिन केले पण अखेर एक रुपया सुद्धा त्यांच्या हाती लागला नाही, त्यामुळे हे पैसे नेमकं कोण आणि कसे परत करणार असा प्रश्न नागरिकांसमोर घर करून बसला आहे. आर्थिक फसवणूकीत पोळलेले सगळेचजण अजूनही न्यायदेवता आणि प्रशासन यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने डोळे लावून बसलेले दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी