28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण...

Eknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण…

आमदार भोंडेकर हे फडणवीस यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या त्या त्यांच्या गळ्यातील दुपट्ट्यामुळे. आमदार भोंडेकर यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा असल्यामुळे आता आमदार शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश करतात की काय अशा चर्चांना उधाण आले.

उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या भंडारा दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी अपक्ष निवडून आलेले मात्र सध्या शिंदे गटात (Eknath Shinde Camp) असलेले भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) हे देखील कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाला उपस्थित होते. आमदार भोंडेकर हे फडणवीस यांच्या बाजूलाच बसले होते. मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या त्या त्यांच्या गळ्यातील दुपट्ट्यामुळे. आमदार भोंडेकर यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा असल्यामुळे आता आमदार शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश करतात की काय अशा चर्चांना उधाण आले.

 ‘फडणवीस देशाचे नेतृत्व करु शकतात’ –

देवेंद्र फडणवीस यांचा सर्व आमदार आदर करतात, त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यांच्या कामाचा प्रभाव सगळ्यांवर असून ते देशाचे नेते होऊ शकतात, फडणवीस हे भविष्यातील देशाचे नेते आहेत, ते देशाचे नतृत्व करणार आहेत, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा –

Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट आली समोर; रुग्णालयाने जारी केले मेडिकल बुलेटिन

Maitreya Scam Update : मैत्रेय विरोधातील लढ्यासाठी नागरिकांची गांधीगिरी; राज्यभरात धरणे आंदोलन

INDvsSA T20I : सूर्याच्या फटकेबाजीमुळे रोहितने रचलाय इतिहास; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय कर्णधार

‘फडणवीसांची इच्छा होती म्हणून दुपट्टा घातला’ –

नरेंद्र भोंडेकर म्हणाले,  फडणवीस हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून मला आदेश पाळावा लागला. भाजपच्या दुपट्ट्यापेक्षा भाजपच्या दुपट्ट्यात भगवा होता. हा भगवा आधीपासूनच माझ्या खांद्यावर आहे. ते मित्र पक्षाचे आहेत. त्यामुळे मित्रपक्षासोबत मी रहायला हवं, भाजपचा दुपट्टा मी भगवा म्हणून वापरला आहे. आम्ही अजून युतीमध्ये आहोत. मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला नाही.  फडणवीस यांची इच्छा होती की, मी भाजपचा दुपट्टा घालावा म्हणून मी घातला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी