27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeमुंबईMumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम...

Mumbai News : रेल्वे प्रवाशाच्या बॅगेत सापडला तब्बल 2 कोटींचा मुद्देमाल! रक्कम बघून आरपीएफही दंग

रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल एक कोटी 17 लाखांची रोकड आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्थानकावर पुष्पक एक्स्प्रेसमधून ही बॅग जप्त करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल एक कोटी 17 लाखांची रोकड आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा रेल्वे स्थानकावर पुष्पक एक्स्प्रेसमधून ही बॅग जप्त करण्यात आली. ही ट्रेन लखनौ ते मुंबई दरम्यान धावते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे मुंबईतील झवेरी बाजार येथे दुकान आहे. त्याच्याकडे सापडलेल्या रोकड व दागिन्यांची कोणतीही ठोस माहिती तो देऊ शकला नाही. आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे ही रक्कम आणि दागिने त्या व्यक्तिकडे कसे काय आले हे तपासाअंती समोर येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशाकडून काय सापडले
आरपीएफ जवानांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून एक कोटी 17 लाखांची रोकड आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. जीपी मंडल असे या व्यावसायिकाचे नाव सांगितले जात आहे. जप्त केलेल्या रकमेचे कोणतेही कागदपत्र त्याच्याकडे नव्हते. त्यावर पुढील कारवाईसाठी आरपीएफने त्याच्याकडून जप्त केलेली रोख रक्कम आणि दागिने आयकर विभागाकडे सुपूर्द केले आहेत.

हे सुद्धा वाचा

Yearly Calender : आधीच्या कॅलेंडरमध्ये केवळ 10 महिने होते! जाणून घ्या महिन्यांच्या नावामागील दडलेले रहस्य

Eknath Shinde Camp: शिंदे गटातील आमदाराच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा; चर्चांना उधाण…

Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट आली समोर; रुग्णालयाने जारी केले मेडिकल बुलेटिन

मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर 1 ऑक्टोबर रोजी लखनौहून मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्स्प्रेसचा वेग कमी करण्यात आला होता. याचा फायदा घेत टिटवाळ्यातील एक प्रवाशी रेल्वेतून खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. या व्यक्तीचे वर्तन संशयास्पद होते. हे पाहून आरपीएफ जवान एल.बी.बाग आणि शुभम खरे यांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अटक करण्यात आलेल्या प्रवाशाला टिटवाळा आरपीएफ कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.

आयकर विभाग तपास करत आहे
तेथे आरपीएफच्या वरिष्ठ निरीक्षक अंजली बाबर यांनी पकडलेल्या व्यक्तीची चौकशी केली. ही माहिती समोर येताच अधिकारी चक्रावले. जीपी मंडल असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील कळंबोली येथे राहतो. त्याचे मुंबईतील झवेरी बाजार येथे दुकान आहे. आरपीएफ जवानांनी त्याच्याकडून एक कोटी 17 लाख रोख आणि 56 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. त्याच्याकडे रोख रक्कम आणि दागिन्यांची कोणतीही कागदपत्रे नव्हती. हे पाहता आरपीएफनेही या प्रकरणाची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे.आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील कारवाई आयकर विभाग करेल अशीही माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात सेवेसाठी उपस्थिती आरपीएफ जवानांचे सध्या सर्वत्र कोतुक केले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी