30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeटॉप न्यूजभाजप नगरसेवकांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना घातला घेराव

भाजप नगरसेवकांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना घातला घेराव

टीम लय भारी

मुंबई : भाजपच्या नगरसेवक गटातर्फे विविध मागण्यांसाठी बेस्ट महाव्यवस्थापकांना आज घेराव घालण्यात आला आहे. या वेळी वाढीव अवाजवी वीज बिलाची आकारणी रद्द करून सर्व सामान्य मुंबईकरांना बेस्ट प्रशासनाने दिलासा द्यावा यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश होता. जवळपास दोन ते तीन तास हा घेराव घालण्यात आले. या वेऴी भाजपचे पदाधिकारी चांगलेच संतापले होते.

बेस्ट वीजबिल भरण्यासाठी मुदत / हप्ते देण्यात आलेत पण तरिही वीज  जोडणी खंडित करण्यात येईल असे एसएमएस बेस्ट ने पाठविले आहेत.   सध्या चालू महिन्याचे बिल घ्यावे व वीज जोडणी खंडित करण्यात येणार नाही असा लेखी एस एम एस त्वरित पाठवावे. लाॅकडाऊन काळातील वीज देयक व त्यावरील शासकीय कर यात माफी व 100 युनिट मोफत याबाबत राज्य शासनाकडून आदेश प्राप्त होईपर्यंत सदर बिल आकारणी / भरणा करणेस सूट देण्यात यावी. या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. हा घेराव भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. अशी माहिती भाजपचे नगरसेवक, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी