टॉप न्यूज

Video : गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर पुन्हा जहरी टीका, ‘बिनबुडाच्या विचारसरणीचे चाणक्य’ अशी केली संभावना

प्रशांत चुयेकर : टीम लय भारी

कोल्हापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे ( Gopichand Padalkar attacks on Sharad Pawar ). शरद पवारांची विचारसणी बिनबुडाची आहे. ते फसवे चाणक्य आहेत, असा वार पडळकर यांनी पवारांवर केला आहे.

शरद पवार आज नवी दिल्लीमध्ये प्रशांत किशोर यांना भेटले. त्यावर फसवे चाणक्य दुसऱ्या चाणक्याचा आधार घेत आहेत, असा पवार यांचा उल्लेख न करता पडळकरांनी वार केला ( Gopichand Padalkar said, Sharad Pawar is fraud Chanakya ).

पडळकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

गोपीचंद पडळकरांनी धनगर आंदोलन पेटवले

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त झाला आहे. त्यांच्या बिनबुडाच्या विचारसरणीला बहुजन भाळणार नाही. तो सावध झाला आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून फक्त आपल्या पाहुण्यांना मोठे करतात ( Gopichand Padalkar said, Sharad Pawar’s politics only for his relatives ). त्यासाठी त्यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीतून अनेक जण निघून गेले आहेत. आता स्थिरता मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असल्याची टीकाही पडळकर यांनी केली.

गोपीचंद पडळकर नक्की काय बोलले ते ऐका

पडळकर यांनी अजित पवारांवरही टीकास्त्र सोडले. नोकरीतील पदोन्नतीचे आरक्षण रद्द करून उपमुख्यमंत्री अजित पवार आपली लोक त्या ठिकाणी बसवत आहेत. हे असंविधानिक आहे. यांना संविधान तरी मान्य आहे का ? असा सवालही पडळकर यांनी केला ( Gopichand Padalkar scathing to Ajit Pawar ).

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले ( Gopichand Padalkar said, Mahavikas Aghadi government failed to implement Maratha Reservation ). मागासवर्गीय आयोग नेमायला सांगितला असतानासुद्धा तो नेमला नाही. ही राज्य सरकारची चूक आहे. चुकीचे सांगून चालत नाही. लोक आता हुशार झालेले आहेत. सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांना सर्व कळतं असेही पडळकर म्हणाले.

आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

तुषार खरात

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

38 mins ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

1 hour ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

14 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

14 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

15 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

15 hours ago