27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रGopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात...

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई : एसटी, एससी आणि ओबीसी हे केंद्र सरकारने दिलेले आरक्षण आहे, मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे राज्य सरकारने त्यांच्या अधिकाराखाली दिले आहे. त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, असे जे मागणी करत आहेत, त्यांचा प्लॅन दिसतोय की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळू नये. त्याचसोबत धनगर आणि आदिवासी समाजात जे भांडण लावतायेत, त्यांनी समजून घ्यावे, एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर आहे. ज्यावेळी धनगर समाजाची लोकसंख्या मोजली जाईल, त्यानुसार आरक्षण दिले जाईल, त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर कुठेही परिणाम नाही. आदिवासींनी गैरसमज करण्याचे कारण नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी नव्हे तर एसटी अंमलबजावणी मागणी आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करू नये, पण जे कोणी ओबीसी आणि मराठा समाजात तसेच आणि धनगर आणि आदिवासी समाजात संघर्ष लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना यश येणार नाही, असे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठणकावून सांगितले आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, धनगर समाजाचा अध्यादेश राज्य सरकार काढणार आहे का? की केंद्राकडे पाठवणार आहे? राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, आमचं मूळचं आरक्षण आहे, त्यामुळे नव्याने आरक्षणाची गरज नाही, जेव्हा राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करेल तेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ, शब्दाच्या गफलतीमुळे धनगर एसटी आरक्षणापासून वंचित आहे. हरियाणा सरकारनं तेथील धनगरांना अध्यादेश काढून आरक्षण दिलं आणि ते केंद्राकडे पाठवलं आहे. आमचा प्रश्न कसाही मिटवावा, धनगर समाजाबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, त्याप्रकारे आमची पुढील भूमिका राहील, समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही पडळकर यांनी सांगितलं.

टीकाकारांकडे लक्ष न देता समाजाचे प्रश्न मांडत राहू. ज्यांना माझ्याबद्दल टीका करायची आहे त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही, ज्यांना माझ्यावर विश्वास आहे त्या लोकांच्या जीवावर मी काम करत राहतो, लोकांनी आता हे आंदोलन हातात घेतलं आहे, मी कार्यकर्ता म्हणून या आंदोलनात सहभागी होतोय, मी नेतृत्व करत नाही, लोकांच्या लढाईत मी सहभागी आहे. त्यामुळे टीकाकारांकडे लक्ष देत नाही अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीकाकारांना फटकारलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी