29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांनी धनगर आंदोलन पेटवले

गोपीचंद पडळकरांनी धनगर आंदोलन पेटवले

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाहन केल्यानुसार शुक्रवारी राज्यभरात धनगर समाजाने आक्रमक आंदोलने केली ( Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation ). भंडारा उधळत आणि ढोल वाजवत धनगर समाजाने ‘महाविकास आघाडी’ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
उस्मानाबाद येथे आंदोलन करताना धनगर बांधव

धनगर समाजाला अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे तातडीने द्यावीत, आदिवासींना असलेल्या सगळ्या योजना धनगर समाजासाठी लागू कराव्यात, फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या योजना विद्यमान महाविकास आघाडी सरकारने अंमलात आणाव्यात इत्यादी मागण्यांसाठी धनगर समाजाने राज्यभरात आंदोलन केले ( Gopichand Padalkar asked to Mahavikas Aghadi for schemes to Dhangar ).

Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
पंढरपूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन झाले
Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
पिंपरी चिंचवड येथे आंदोलन करताना धनगर बांधव

पंढरपुरात स्वतः गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो धनगर बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. या शिवाय औरंगाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, परभणी, जालना, नवी मुंबई, सोलापूर इत्यादी ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात आली.

Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
सांगली येथे आंदोलन करताना धनगर बांधव

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व ग्रामपंचायत कार्यालयांसमोर धनगर समाजाने आंदोलने केली.

Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
माळशिरस येथे आंदोलन करताना धनगर कार्यकर्ते

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पंढपुरात भंडाऱ्याची उधळण व ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.

Gopichand Padalkar started agitation for Dhangar reservation
जालना येथे आंदोलन करताना धनगर बांधव

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी