टॉप न्यूज

खडसे यांच्या पत्नी पराभूत; जळगाव दूध संघात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण विजयी

जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात विकास निवडणुकीत राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मदाताई खडसे या पराभूत झाल्या आहेत. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. राजकीय कोंडी झालेल्या खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

मंगेश चव्हाण यांनीच मंदाताई खडसे अध्यक्ष असलेल्या जळगाव दूध संघात प्रशासाक आल्यानंतर गैरव्यवहाराविरोधात रान उठवले होते. ते गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलमधून विजयी झाले. खडसे या महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवार होत्या. आमदार अनिल भाईदास पाटील, दगडू चौधरी, प्रमोद पाटील,भामरे, नगरसेवक अमर जैन, संजय पवार व श्यामल झांबरे हेही संचालक म्हणून निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी, महाजन यांचे पीए जळगाव दूध संघात विजयी; खडसे-महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

चंद्रकांत पाटील यांचे विधान अत्यंत दुर्दैवी; रयत शिक्षण संस्थेने केला निषेध

जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात विकास निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर यांनी विजयी निकाल नोंदविला आहे. महिला राखीव गटातून त्या विजयी झाल्या आहेत यातून प्रथमच देवकर कुटुंबाने जळगाव दूध संघात प्रवेश केला आहे. भाजप मंत्री गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख हेही विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे पुत्र गोपाळ मोरे हेही ओबीसी राखीव मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी गोपाळ भंगाळे यांना 31 मतांनी पराभूत केले. खडसे यांचे विश्वासू असलेले भुसावळचे आमदार व माजी मंत्री संजय सावकारे हेही अनुसूचित जाती गटातून 76 मतांनी विजयी झाले आहेत.

संघाच्या 19 जागांसाठी काल, शनिवारी 100 टक्के मतदान झाले होते. एकूण 39 उमेदवार रिंगणात आहेत. एकनाथ खडसे, भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री असलेले शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील पाच आमदारांची प्रतिष्ठा जळगाव दूध संघ निवडणुकीत पणाला लागली आहे. मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. महिला राखीव गटातून दोन जागांवर छाया गुलाबराव देवकर व पूनम पाटील या विजयी झाल्या आहेत. देवकर या सहकार तर पाटील या शेतकरी पॅनलच्या आहेत.

पूनम पाटील या भडगाव तालुक्यातील शिक्षणसम्राट प्रताप हरी पाटील यांच्या कन्या आहेत. पाटील यांच्या पत्नी साधना पाटील या पाच वेळा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. मात्र, पक्षाची सत्ता जाताच पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव गटाची सत्ता जाताच ते शिंदे गटात प्रवेश करून मोकळे झाले. या राजकीय कोलांटउड्यांची बक्षिसी त्यांच्या लेकीला मिळाली आहे. प्रताप पाटील यांचे वडील हरी रावजी पाटील यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम असून शिक्षण संस्स्थांचे साम्राज्य त्यांनीच उभे केले. त्यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केले होते.

जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात जळगाव दूध संघासाठी चुरस आहे. निवडणूक प्रचारात या दोघांतील कलगीतुरा चांगलाच रंगला होता. प्रचाराने सभ्यता, संकेत आणि मर्यादांची पातळीही ओलांडली होती. किळसवाण्या आरोप-प्रत्यारोपाच्या तामाशाने जिल्ह्यातील जनतेला वीट आला होता. आजवर कधीही विकास निवडणुकीत एव्हढी चुरस अनुभवायला मिळाली नव्हती.

खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या अध्यक्ष असलेल्या जळगाव दूध संघावर प्रशासक नेमून महाजन यांनी खडसेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. प्रशासक काळात तूप गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबाला गोवण्याचेही प्रयत्न केले गेले. शिंदे सरकारने नेमलेल्या 11 जणांच्या चौकशी समितीत महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांचा समावेश आहे. सूडाच्या राजकारणात बदनाम झालेला जळगाव दूध संघ शिंदे सरकारसाठीही डोकेदुखीचा विषय ठरला आहे.

खडसे यांच्यासह माहाविकास आघाडीच्या नेत्यांचे सहकार पॅनल विरुद्ध महाजन-गुलाबराव पाटील व शिंदे गटाचे शेतकरी पॅनल अशी सरळ लढत या निवडणुकीत आहे. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण हेही शेतकरी पॅनलमधून सक्रिय आहेत. खडसेंची राजकीय कोंडी करण्याचे या निवडणुकीत जोरदार प्रयत्न होत आहे.

 

 

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

33 mins ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

45 mins ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

52 mins ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

1 hour ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

1 hour ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

2 hours ago