टॉप न्यूज

Video : ‘रिपब्लीक टीव्ही’च्या अतिशहाण्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांकडून चोप

टीम लय भारी

मुंबई : आदळआपट व थयथयाटी पत्रकारीतेसाठी ओळखल्या जात असलेल्या ‘रिपब्लीक टीव्ही’च्या दोन पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी आज चांगलाच चोप दिला ( Republic journalist beaten by Mumbaikar journalist ).

‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) कार्यालयाबाहेर विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जमले होते. यावेळी दिल्लीहून आलेल्या ‘रिपब्लीक टिव्ही’च्या दोन पत्रकारांनी अतिशहाणपणा केला.

एनडीटीव्ही आणि एबीपी या दोन वृत्तवाहिन्यांवर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी टीका केली. मुंबईकर पत्रकारांना ‘चाय बिस्कूट खाणारे गरीब पत्रकार’ अशा शब्दांत हिणवले. त्यामुळे ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना मुंबईकर पत्रकारांनी भाषा आवरती घेण्याची विनंती केली. त्यावर ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांनी आणखी आकांडतांडव केले. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकर पत्रकारांनी ‘रिपब्लीक’च्या पत्रकारांना चांगलाच चोप दिला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद वाढणार नाही याची काळजी घेतली.

विशेष म्हणजे, दिल्लीहून आलेल्या या दोघांपैकी एकजण पत्रकार नाही. ‘रिपब्लीक टिव्ही’च्या चर्चेत सहभागी होणारा तो ‘गेस्ट’ आहे. तरीही या पत्रकार नसलेल्या व्यक्तीला वार्तांकनासाठी ‘रिपब्लिक टिव्ही’ने कसे काय पाठविले असाही सवाल उपस्थित झाला आहे. या ‘गेस्ट’ असलेल्या तथाकथित पत्रकारांनेच आकांडतांडव करून मुंबईकर पत्रकारांबद्दल अपशब्द काढल्याने हा वाद चिघळल्याचे घटनास्थळी असलेल्या पत्रकारांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

सद्सदविवेकबुद्धी असलेल्या सामान्य जनतेमधून ‘रिपब्लीक टिव्ही’च्या थयथयाटी पत्रकारितेबद्दल नेहमीच रोष व्यक्त करण्यात येतो. पण पत्रकारिता क्षेत्रातूनही अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या ‘रिपब्लीक टिव्ही’बद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या घटनेनंतर मुंबईकर पत्रकारांनी ‘रिपब्लीक’च्या अतिशहाणपणाबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

तुषार खरात

View Comments

  • एका पत्रकाराने एका पत्रकाराबद्दल वाईट बोलावे आणि एका पत्रकाराने त्याच्या बद्दल वाईट बोलावे ह्या सारख्या गोष्टी आमच्या भारतात घडतात ह्या पेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. कोण चाय बिस्किट खाते आणि कोण नाही हे सगळ्यांना माहीत आहे. दिशा ची file delete झाली होती तेव्हाच का नाही बोले मग पत्रकार. तेव्हा मूग गिळून गप्प होते का? न ओळखणाऱ्या जनतेला मूर्ख समजू नका. कधी न कधी विजय सत्याचा च होणार.
    पण ही शोकांतिका नक्कीच आहे आमच्या महाराष्ट्रची की personal bais असणारे पत्रकार आहेत. त्या मुळे स्वातंत्र्यवीर ह्यांचा पराभव पण आहे. असो देव खरे बघायची सद्बुद्धी सगळ्यांना देवो.

    • एका पत्रकाराने एका पत्रकाराबद्दल वाईट बोलावे आणि एका पत्रकाराने त्याच्या बद्दल वाईट बोलावे ह्या सारख्या गोष्टी आमच्या भारतात घडतात ह्या पेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. कोण चाय बिस्किट खाते आणि कोण नाही हे सगळ्यांना माहीत आहे. दिशा ची file delete झाली होती तेव्हाच का नाही बोले मग पत्रकार. तेव्हा मूग गिळून गप्प होते का? न ओळखणाऱ्या जनतेला मूर्ख समजू नका. कधी न कधी विजय सत्याचा च होणार.
      पण ही शोकांतिका नक्कीच आहे आमच्या महाराष्ट्रची की personal bais असणारे पत्रकार आहेत. त्या मुळे स्वातंत्र्यवीर ह्यांचा पराभव पण आहे. असो देव खरे बघायची सद्बुद्धी सगळ्यांना देवो.

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

8 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

8 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

8 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

8 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

9 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

9 hours ago