33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeव्हिडीओVIDEO : महिला अधिकाऱ्याची दादागिरी, समस्या मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर आगपाखड

VIDEO : महिला अधिकाऱ्याची दादागिरी, समस्या मांडणाऱ्या कार्यकर्त्यावर आगपाखड

लय भारी न्यूज नेटवर्क

दर्यापूर : याला माझ्या केबिनबाहेर काढा… तुला दाखवतेच… याला पोलिसांच्या ताब्यात द्या… तुला कळेल मग… हे शब्द कुठल्या गावगुंडाचे नाहीत. चक्क एका अधिकाऱ्याने केलेली ही अरेरावी आहे. महिला असूनही सामाजिक कार्यकर्त्यावर बेछूट आरोपाच्या फैरी या अधिकारी झाडत आहेत. दर्यापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी या फैरी सागर देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर झाडल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन देशमुख हे आंबेकर यांना भेटण्यासाठी गेले होते. पण चर्चा करीत असताना आंबेकर आणि देशमुख यांचे बिनसले. वास्तवात, एखाद्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते आक्रमक होत असतात. अशा वेळी अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे असते. कार्यकर्त्याने मांडलेली समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल याचा अधिकाऱ्यांनी विचार करणे अपेक्षित असते. अनेकदा कार्यकर्त्याने सांगितलेली समस्या सोडविणे शक्य नसते. अशा परिस्थितीत अधिकारी कौशल्य दाखवून कार्यकर्ते भडकणार नाहीत याची काळजी घेतात. अधिकाऱ्यांकडे शांत राहून काम करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. पण आंबेकर यांच्याकडे हे कौशल्यच नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

आंबेकर एक सरकारी नोकर आहेत. असे असतानाही याला ‘माझ्या केबिन’बाहेर काढा, ‘पोलिसांना बोलवा’ अशी आक्षेपार्ह विधाने त्या करीत आहेत. सरकारी यंत्रणा आपल्या खासगी मालकीची असल्याचा समज आंबेकर यांनी करून घेतल्याचे त्यांच्या विधानातून दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्याशी त्या एवढ्या अरेरावीत बोलत आहेत. मग सामान्य व गोरगरीब लोकांचे त्या म्हणणे तरी ऐकून घेतात का अशीही शंका हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उपस्थित झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी