व्हिडीओ

VIDEO : धक्कादायक; प्रीस्क्रिप्शन लिहीत असतानाच हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू

ड्युटीवर असताना एका डॉक्टरला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रीस्क्रिप्शन लिहीत असतानाच हृदयरोगतज्ञाला हार्ट अटॅक आल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. (Dr Sunita Vinayak Hospital Heart Specialist Died Due to Heart Attack) हा सीसीटीव्ही फूटेजवर आधारित व्हिडिओ मुंबईतील विनायक हॉस्पिटलमधील असल्याचा दावा केला जात आहे.

टाईम्स ऑफ इंडिया माध्यमसमूहाने मुंबईतील घटना म्हणून काल हा व्हिडिओ शेयर केल्यानंतर तो वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. “मुंबईतील हृदयरोग तज्ज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू,” अशी व्हिडिओ बातमी ‘टाईम्स’ने 22 जानेवारी 2023 रोजी रात्री 8:03 वाजता शेयर केली आहे. या बातमीत म्हटले आहे, की मुंबईतील हृदयविकार तज्ज्ञाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर हॉस्पिटलमधील फाईलमध्ये लिहित असतानाच खाली कोसळताना दिसत आहेत. ही व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने नव्याने शेयर केलेल्या या व्हिडिओत हॉस्पिटलमधील पेशंट राऊंड घेतल्यानंतर हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर हे रिसेप्शन काऊंटरवर काही रूग्णांसाठी प्रीस्क्रिप्शन लिहून देताना दिसतात. पेशंटचे रिपोर्टस पाहून ते उजव्या हाताने रिमार्क लिहीत असतानाच त्यांना अस्वस्थता जाणवलेली दिसते. ते काही सेकंद डावा हात कपाळाला लावतात. बहुधा त्यांना वेदना होत असाव्यात आणि घाम येत असावा. पुढल्याच क्षणी हे डॉक्टर धापकन खाली कोसळतात. त्या झटक्याने रिसेप्शन काऊंटरसुद्धा हलते व मागे सरकते. डॉक्टर अचानक जमिनीवर कोसळलेले पाहताच सिस्टर व स्टाफची धावाधाव सुरू होते. एक सिस्टर डॉक्टरांचा बीपी मोजण्याचा प्रयत्न करते; पण ते बहुधा शक्य होत नाही. त्याच घाबरलेल्या अवस्थेत ती सिस्टर रिसेप्शनवरून कुणाला तरी फोन कॉल लावताना दिसते. हॉस्पिटलमधील शेजारील वॉर्डातील काही रुग्णांचे नातेवाईकही धावपळ करताना दिसतात; पण नेमके काय होते ते कुणालाही कळलेले दिसत नाही.

सीसीटीव्ही व्हिज्युअल दाखवत मुंबईतील विनायक हॉस्पिटलमध्ये नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका हृदयरोगतज्ज्ञाचा मृत्यू झाल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियातील व्हिडिओ व बातम्यात केला गेला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात संबंधित हृदयरोगतज्ञांचा उल्लेख डॉ. सुनीता असा केला जात आहे. त्या विनायक रुग्णालयात कार्यरत हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

‘लय भारी’ने केले व्हिडिओबाबत फॅक्ट चेक

‘लय भारी’नेही या व्हिडिओबाबत सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यासंदर्भात आधीच फॅक्ट चेक केले गेले असल्याचे लक्षात आले. मुंबईतील विनायक हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असताना हृदयविकार तज्ज्ञाचा मृत्यू झाल्याचा दावा करणारा हा अलीकडील व्हिडिओ नसून जुनीच घटना असल्याचे स्पष्ट झाले. शेअर केलेल्या व्हिडिओमधील घटना ही कर्नाटकातील बंगळुरू येथील विनायक हॉस्पिटलमध्ये घडलेली जुनी घटना आहे. 26 नोव्हेंबर 2017 रोजी हृदयरोग तज्ञ डॉ. सुनीता यांना कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे विनायक रुग्णालयातच निधन झाले होते. ही घटना मुंबईत घडलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट दिशाभूल करणारी असल्याचे ‘फॅक्टली’च्या पडताळणीत आधीच दिसून आले आहे.

व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर, CCTV फुटेजमध्ये दिनांक 11-26-2017 दिसते. त्यामुळे या फुटेजमढील घटना ही नोव्हेंबर 2017 मध्ये घडलेली जुनी घटना असल्याची पुष्टी करता येते. व्हिडिओमधील स्क्रीनशॉट्सचे रिव्हर्स इमेज सर्च केले असता, तोच व्हिडिओ 14 डिसेंबर 2017 रोजी आपलोड केल्या गेलेल्या फेसबुक पोस्टमध्ये आढळून आला. हृदयरोग विशेषज्ञ डॉ. सुनीता यांचा कर्नाटकातील बंगलोर येथील विनायक रुग्णालयात कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. काही इतरही युझर्सनी डिसेंबर 2017 मध्ये अशाच वर्णनासह हा व्हिडिओ शेअर करत डॉ. सुनीता यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे सुद्धा वाचा : 

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

हृदय निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ गोष्टी नक्की करा

Covid : कोरोनामुळे रुग्णाच्या हृदयाची स्थिती बिघडू शकते, अभ्यासात धक्कादायक खुलासा

‘न्यूजफ्लेअर’नेही डिसेंबर 2017 मध्ये एका लेखात हाच व्हिडिओ शेअर केला आहे. विनायक हॉस्पिटल प्रशासनाने ‘न्यूजफ्लेअर’ला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की “आम्ही डॉ. सुनीता यांना ICUमध्ये नेले आणि इंट्राकार्डियाक इंजेक्शनसह शक्य तितके सर्वोत्तम उपचार दिले; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.” 2017 मध्ये या घटनेचा अहवाल देणारे लेख आणि इतर काही बातम्या अनेक वेबसाइट्सनी प्रकाशित केल्या आहेत. ते या लिंकवर क्लिक करून पाहिले जाऊ शकतात .

सारांश, ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या डॉक्टरचा हा जुना व्हिडिओ मुंबईचा नसून बेंगळुरूचा आहे.

Heart Specialist Died Due to Heart Attack, हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका, Dr Sunita Vinayak Hospital, Viral Video, Lay Bhari News

 

विक्रांत पाटील

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

14 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

15 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

16 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

18 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

19 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

19 hours ago