31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईतुमचा राजकीय पक्ष मेलेल्या व्यक्तीला परत आणणार नाही, इरफान पठाणने कंगनाला झापलं

तुमचा राजकीय पक्ष मेलेल्या व्यक्तीला परत आणणार नाही, इरफान पठाणने कंगनाला झापलं

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा अपूरी पडत आहे, त्यांना जाळण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. तुमचा राजकीय पक्ष मेलेल्या व्यक्तीला परत आणणार नाही, इरफान पठाणने कंगनाला झापलं आहे (Your political party will not bring back the dead person, Irfan Pathan has slapped Kangana).

दुसऱ्या लाटेच्या तडाख्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसीवीरचा तुटवडा याबाबतच्या बातम्या वारंवार वाचायला मिळत आहेत. सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटींनाही याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. परंतु, देशातील परिस्थिती सुधारण्याच्या हालचाली करण्यापेक्षा राजकारणच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यावरुन भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने खरमरीत ट्विट केले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

विराट-अनुष्काच्या मोहिमेला अजून दोन दिवस बाकी जमा झाले 11 कोटी

”तुम्ही ज्या पक्षासाठी भांडताय, ज्यांना पाठींबा देताय तेही मृतांना जीवंत करू शकत नाहीत,” असे ट्विट करून इरफानने #IndianLivesMatter हा टॅग वापरला आहे.

पठाणच्या या ट्विटवरून त्याला ट्रोल करण्यास सुरूवात झाली आणि त्याने त्यांनाही चांगलेच सुनावले. यावेळी त्याने कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) नावाचाही उल्लेख केला. ”माझे सर्व ट्विट्स हे एकतर मानवतेसाठी किंवा देशवासीयांसाठी आहेत. मी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्या हक्काने मी मत मांडतोय. त्याविरोधात मला कंगनासारख्या (Kangana) अनेक लोकांकडून प्रत्युत्तर मिळतेय. द्वेष पसरवणाऱ्या कंगनाचे (Kangana) ट्विट अकाऊंट काढून टाकण्यात आले आहे,”असे इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला.

देशात मागील २४ तासांत ३ लाख ६२,७२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ३ लाख ५२,१८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४१२० जणांना प्राण गमवावे लागले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ कोटी ३७ लाख ०३,६६५ इतकी झाली आहे. त्यापैकी १ कोटी ९७ लाख, ३४,८२३ रुग्ण बरे झाले आहेत. मृतांची संख्या ही २ लाख ५८,१३७ इतकी आहे. आतापर्यंत १७ कोटी ७२ लाख १४,२५६ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

इरफान व युसूफ पठाण यांचे समाजकार्य

इरफान (Irfan) व युसूप ही पठाण बंधूंची जोडी या काळात अनेकांसाठी खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये भरभरून मदत केल्यानंतर ही जोडी पुन्हा मदतीसाठी सक्रीय झाली आहे. वडोदरा पाठोपाठ आता ही जोडी दक्षिण दिल्लीत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याच काम करत आहेत.

Supporting Palestine But No Tweet On Bengal Violence? Irfan Pathan & Kangana Ranaut Get Into Online Spat

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण (Pathan) बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनाने PPE किट्स आणि मास्कचे वाटपही केले होते. आता कोरोना संकट पुन्हा डोके वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावाने सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे.

क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स (Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी