33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रयुवा सेनेने ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला!

युवा सेनेने ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला!

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा,महाविद्यालये बंद आहेत. बंदच्या काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत शासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहे. शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून युवा सेनेचे सचिव वरून देसाई आणि कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांना काही सूचना मांडल्या आहे.

शिक्षण विभागाने फी वाढ शालेश फी भरण्यावरून पालकांना दिलासा दिल्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचे युवा सेनेकडून आभार मानण्यात आले. तसेच ऑनलाईन शिक्षणाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून पावले उचलावी यासाठी काही मागण्या केल्या आहेत.

युवा सेनेने ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला!

युवा सेनेकडून या केल्या मागण्या…

1 ऑनलाईन शिक्षण सत्र कालावधीत अनेक शाळांमध्ये असमानता दिसून येते. प्राथमिक शाळेच्या मुलांचे देखील ऑनलाईन सत्रांचे जादा तास असल्याचे आहेत. ज्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शालेय शिक्षण विभागाने मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन प्रत्येक इयत्तेसाठी एकसमान ऑनलाईन सत्र कालावधी निश्चित करावे

2. कोरोनाच्या संकटात निम्म मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांना ही आर्थिक फटका बसला आहे. तसेच ज्यांना दोन वर्ष त्यांची चिंता अधिक वाढली आहे म्हणून अशावेळी या पालकांना स्मार्टफोन व इंटरनेट कनेक्टिव्हिटी खरेदी करणे परवडत नसल्यामुळे शाळांकडून काही योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

3. ज्या कुटुंबात आई वडिल कामावर असतील अशा पालकांना ऑनलाईन शिक्षणाची सक्ती करु नये. व सत्राचे विडियो रेकॉर्ड करुन पालकांना ऑफलाईन व्हाटस्अपव्दारे पाठवण्याची व्यवस्था असावी.

अशा विविध मागण्या युवा सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व बाबींवर विचार व उपाययोजना कराव्या अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे. पत्रकावर  युवासेनेचे सचिव वरून देसाई आणि कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या स्वाक्ष-या आहे.

युवा सेनेने ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षणमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला!

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी