31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईBJP'sHypocrisy : भाजपचा आणखी एक खोटारडेपणा : जुना व्हिडिओ प्रसारीत करुन ठाकरे...

BJP’sHypocrisy : भाजपचा आणखी एक खोटारडेपणा : जुना व्हिडिओ प्रसारीत करुन ठाकरे सरकारची बदनामी

भाजपाच्या आयटी सेलवर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

 

टीम लय भारी

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपने (BJP) आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन सुरू केले आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवर महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ टाकून स्वत:चेच हसे करुन घेतले आहे.

राज्यात कोरोनाची (Coronavirus) समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ या आंदोलनाद्वारे महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजप उघडकीस आणणार आहे. मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजपचा हा खोटारडेपणा (Hypocrisy) उघडकीस आला आहे.

‘महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कॉरंटाईनची सोयीसुवीधा असतील, रूग्णालय असतील, पेशंटची गैरसोय होत आहे लॉकडाऊन ४ सुरू झाले पण राज्य सरकारकडे अजूनही काही ठोस पाऊलं उचलताना दिसत नाही व नियोजनाचा अभाव जाणवत असल्यामुळे सामान्य जनता व कोरोना वॉरियर्स सुद्धा त्रस्त झाले आहे’ असे ट्विट करत ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवर महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ टाकण्यात आला आहे.

राज्यातील जनता कोरोनाशी (Coronavirus) संघर्ष करत असताना त्यांना चांगला प्रतिसाद देण्याऐवजी महिन्याभरापूर्वीचा व्हिडिओ टाकून जनतेमध्ये असंतोष पसरवण्याचा कुटील डाव रचणा-या महाराष्ट्र विरोधी भाजपाच्या आयटी सेलवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटद्वारे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी