30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeव्हिडीओBJP MLA : भाजपचा आमदार लोकांसोबत पोहण्यात दंग, सोशल डिस्टन्शिंगच्या तिनतेरा

BJP MLA : भाजपचा आमदार लोकांसोबत पोहण्यात दंग, सोशल डिस्टन्शिंगच्या तिनतेरा

टीम लय भारी

मुंबई : सोशल डिस्टन्शिंग पाळण्याबाबत केंद्र व राज्य सरकार वारंवार सुचना करीत आहे. परंतु भाजपच्या ( BJP MLA ) एका आमदाराने सरकारी सुचना धाब्यावर बसविल्या आहेत. लोकांना सोबत घेऊन हे आमदार महोदय विहिरीत पोहण्यात दंग आहेत.

उघडबंब अवस्थेत लोकांसोबत पोहण्याचे व्हिडीओसेशन या आमदार ( BJP MLA ) महोदयांनी केले आहे. जयकुमार गोरे ( BJP MLA ) असे या बेफिकीर आमदारांचे नाव आहे. माण – खटाव विधानसभा मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. मुळचे काँग्रेसचे असलेले हे आमदार महोदय विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झाले होते.

विशेष म्हणजे, गोरे ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात, त्या माण – खटावमध्ये चार कोरोना रूग्ण आढळून आहेत. मतदारसंघामध्ये मुंबई व पुण्यावरून मोठ्या संख्येने लोक येऊ लागले आहेत. त्यामुळे गावागावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबई – पुण्यावरून आलेल्या लोकांचे ‘होम कोरन्टाईन’ करण्यामध्ये अनेक समस्या आहेत. प्रशासनाला सोबत घेऊन या महत्वाच्या समस्येमध्ये त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांना मार्गदर्शन करणारे व्हिडीओ त्यांनी व्हायरल करायला हवेत. त्याऐवजी लोकांना गोळा करून पोहतानाचा व्हिडीओ या आमदार महोदयांनी व्हायरल केला आहे.

लोकांनीही आता बेफिकीरपणे असे एकत्र येऊन पोहायला गेले पाहीजे असा संदेश आमदार महोदयांना ( BJP MLA ) द्यायचा आहे की काय असाही सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

Rane Vs Pawar

लोकांनी घराबाहेर जाऊ नका. अनेकांनी एकत्र येऊ नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सुचना केलेल्या आहेत. पण आपल्या नेत्याच्या आवाहनाचे उल्लंघन होणार नाही याचीही काळजी या आमदार महोदयांनी घेतलेली दिसत नाही.

दरम्यान, आमदारांच्या ( BJP MLA ) या बेफिकीरपणाबद्दल भाजपचे पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का ? असाही सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

हे सुद्धा वाचा

BJP’sHypocrisy : भाजपचा आणखी एक खोटारडेपणा : जुना व्हिडिओ प्रसारीत करुन ठाकरे सरकारची बदनामी

Nilesh Rane ‘पवारांवर बोलण्याअगोदर निलेश राणेंनी वडीलांचा सल्ला घ्यावा’

लॉकडाऊन : मजुरांच्या एसटीला यवतमाळमध्ये भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

केंद्र स्थलांतरीत मजुरांचे 85% रेल्वे भाडे देते याचा पुरावा द्या अन्यथा जनतेची माफी मागा; चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे आव्हान

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी