31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईअजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई : अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कामाचा झपाटा लावला आहे. कामांचा निपटारा वेगाने करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयात सक्षम अधिकाऱ्यांची फळीच नेमली आहे. अशातच बारामतीच्या आणखी एका अधिकाऱ्याला अजितदादांनी आपल्या दिमतीला पाचारण केले आहे. अजितदादांचे ‘विशेष कार्य अधिकारी’ (ओएसडी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती
‘पाणी फाऊंडेशन’अंतर्गत जलसंधारणाच्या श्रमदानात सहभागी झालेले हनुमंत पाटील.

हनुमंत पाटील असे या बारामतीच्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. बारामतीमध्ये ते तहसिलदार म्हणून कार्यरत होते. अत्यंत नम्र व तितकेच कार्यक्षम अशी त्यांची ख्याती आहे. बारामतीमध्ये असताना त्यांनी सामान्य लोकांसाठी अनेक कल्पक उपक्रम राबविले. अधिकारी असले तरी ते तळागाळात जायचे. लोकांच्या समस्या समजून घ्यायचे. जलसंधारणाच्या कामांमध्ये त्यांनी श्रमदान सुद्धा केले आहे. सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ते कल्पकपणे निपटारा करायचे.

अजितदादांच्या कार्यालयात बारामतीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती
जाहिरात

प्रशासकीय कामांमध्येही त्यांचा हातखंडा आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी कोणत्याही कागदपत्रांकरीता येणाऱ्या लोकांसाठी त्यांनी सुटसुटीत यंत्रणा राबविली होती. कागदपत्रांसाठी अथवा अन्य कोणत्याही कामांसाठी येणाऱ्या लोकांना फार त्रास होणार नाही अशी प्रशासकीय यंत्रणा त्यांनी बारामतीमध्ये राबविली होती.

हनुमंत पाटील यांच्या या अष्टपैलू गुणांची दखल अजितदादांनी घेतली, अन् थेट स्वतःच्या कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्ती केली. अजितदादांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कामे घेऊन येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. लोकांची कामे करण्यासाठी सक्षम अधिकारीही दिमतीला हवेत. त्यामुळेच अजितदादांनी आपल्या कार्यालयात अनेक कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यात आता हनुमंत पाटील यांचीही भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

अजितदादांना भेटण्यासाठी तुडुंब गर्दी, मंत्रालयाबाहेरही लांबलचक रांगा

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी