33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनआदित्य ठाकरेंचा आणखी एक कल्पक उपक्रम; यंदापासून महापालिकेमार्फत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा...

आदित्य ठाकरेंचा आणखी एक कल्पक उपक्रम; यंदापासून महापालिकेमार्फत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकेका कल्पक उपक्रमाला मूर्त रूप द्यायला सुरूवात केली आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सीबीएसई, आयसीएसई बोर्डातील शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी या बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसारच गेल्या वर्षी हा प्रस्ताव तयार केला होता. तो अखेर महापालिकेने मंजूर केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये हा प्रस्ताव मांडला होता. समितीने तो आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवला होता. आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या सकारात्मक अभिप्रायानंतर शिक्षण समितीने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केला आहे. जी – उत्तर विभागातील वूलन मिल मनपा शाळेमध्ये आयसीएसई, तर जोगेश्वरी येथील पूनमनगरमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी ज्युनियर व सिनीअर केजी, तसेच इयत्ता पहिली ते सहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहेत. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण पुरविण्यात येणार असल्याची माहिती दुर्गे यांनी ‘लय भारी टीम’ला दिली.

आदित्य ठाकरेंचा आणखी एक कल्पक उपक्रम; यंदापासून महापालिकेमार्फत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार
जाहिरात

हे सुद्धा वाचा 

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी